CBSE Class 12 Board Exam Time Table २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आज २ फेब्रुवारी रोजी, १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकतात. Date-sheet of @cbseindia29 board exams of class Xll. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ऑक्सफोर्डच्या डिक्शनरीत समाविष्ट झाला पंतप्रधान मोदींनी दिलेला शब्द
ऑक्सफोर्डने आपल्या हिंदी शब्दांमध्ये आणखी एक नवीन शब्द जोडला आहे. तो शब्द आहे ‘आत्मनिर्भरता’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी जेव्हा देश कोरोनाच्या विळख्यात होता आणि त्यावर मात करण्यासाठी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले जात होते, त्यावेळी या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवण्याविषयी नमूद केले […]
संतापजनक : मुलीला शोधण्यासाठी दिव्यांग आईकडे मागितली लाच, भीक मागून पोलिसाच्या गाडीत भरलं 12 हजारांचं डिझेल
उत्तर प्रदेश : कानपूर जिल्ह्यातील सनिगवां गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे राहणारी गुडिया नावाची दिव्यांग महिला भीक मागून उदरनिर्वाह करते. ती तिची १५ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन गेली असता तेथील पोलीस ठाण्याच्या प्रभारीने (SI) तिच्याकडे लाच मागितली. मिळालेल्या माहितीनुसार, गुडियाची 15 वर्षांची मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे. पोलिसांनी गुडियाची तक्रार नोंदवून […]
RBI ने घेतला मोठा निर्णय, HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी
RBI ने HDFC बँकेवर नवीन डिजिटल सेवा सुरू करण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी घातली होती. यानंतर आरबीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट करण्याची जबाबदारी ही बाहेरील व्यावसायिक आयटी फर्मकडे देण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 30 (1) B अंतर्गत आरबीआयने हा निर्णय घेतला […]
ब्रेकिंग : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरला अटक, NCB ने घेतले ताब्यात
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी समन्स बजावल्यापासून ऋषिकेश पवार फरार झाला होता. एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती मिळाली होती. त्यानंतर ऋषिकेशची हार्ड डिस्क एनसीबी अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे अनेक ड्रीम प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्टवर ऋषिकेश हा […]
POCO M3 आज भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
POCO M3 आज भारतात लॉन्च होत आहे. इव्हेंटची सुरुवात दुपारी 12 वाजता होईल. लॉन्च दरम्यान या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धता याविषयी माहिती देण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन POCO M2 चा अपग्रेड म्हणून भारतात लॉन्च केला जाईल. भारतात POCO M2 लाँच झाल्यापासून त्याच्या 1 दशलक्षहून अधिक युनिट्सची विक्री झाली होती. भारतात POCO M3 दुपारी 12 […]
भयंकर : १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार
कर्नाटकमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुलीच्या मावशीचा देखील समावेश आहे. जिल्हा बालकल्याण समिती सभापतींनी ३० जानेवारीला पोलीस ठाण्यात १७ जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात […]
अभिमानास्पद! नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला नियुक्त
अमेरिका : भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी […]
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, आमिर आता नाही वापरणार मोबाईल
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत आमिर खानने मोबाईलचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरने आपल्या पुढील चित्रपटासाठी ही वेगळीच पद्धत अवलंबली आहे. फोन सतत त्याच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, असं आमीरचं म्हणणं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामध्ये त्याचा […]
LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, ग्राहकांना मोठा झटका
इंडियन ऑईल आणि LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या नव्या दरांची घोषणा करत असते. यावेळी IOCL ने कमर्शियल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. 19 किलो वजनाच्या कमर्शियल LPG सिलिंडरचे दर 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढले आहेत. तर […]










