cbse class 12 date sheet 2021 time table released today
देश शैक्षणिक

ब्रेकिंग : १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Class 12 Board Exam Time Table २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आज २ फेब्रुवारी रोजी, १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकतात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ३१ डिसेम्बरला घोषणा केली होती कि, सीबीएसई बोर्डाची परीक्षा 4 मे ते १० जून या कालावधीत घेण्यात येईल. त्याचबरोबर प्रॅक्टिकल परीक्षा १ मार्चपासून सुरू होतील. तथापि, प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखांची घोषणा संबंधित शाळांकडून स्वतंत्रपणे दिली जाईल. बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर त्यांचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होईल असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले होते.

१२ वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक असे करा डाउनलोड :

  1. अधिकृत संकेतस्थळ cbse.gov.in वर जा.
  2. मग नवीन वेबसाइटवर जा.
  3. आता लेटेस्ट@सीबीएसई सेक्शनमध्ये डेटशीट च्या लिंकवर क्लिक करा.
  4. आता आपल्यास नवीन पृष्ठावर आणले जाईल. येथे आपला क्लास निवडा. आता सीबीएसई 12 वी च्या क्लासचे वेळापत्रक स्क्रीनवर उपलब्ध होईल.

विद्यार्थी वेळापत्रक तपासून पुढील वापरासाठी डाउनलोड करू शकतात आणि प्रिंट आउट देखील काढू शकतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत