Delhi Police announces rewards on 8 accused including Deep Sidhu
देश

लाल किल्ला हिंसाचार प्रकरण : दीप सिद्धूसह 8 आरोपींवर दिल्ली पोलिसांकडून बक्षिसांची घोषणा

२६ जानेवारीला झालेल्या लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी दीप सिद्धू, जुगराज सिंह, गुरजंत सिंह, गुरजोत सिंह, जगबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंह यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी सिंघू, टीकरी आणि गाझीपूर सीमेवर तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र 26 […]

Blood bank
देश रक्‍तदान

धक्कादायक : देशात ६३ जिल्ह्यात रक्तपेढ्याच नाहीत

पुणे : देशात एकूण ३३२१ रक्तपेढ्या आहेत पण अजूनही देशातील ६३ जिल्ह्यात एकही रक्तपेढी नसल्याचे समोर आले आहे. देशातील सर्व जिल्ह्यात किमान एक रक्तपेढी असावी याबाबत सरकारने काही पावले उचलली आहेत का? असा प्रश्न आरोग्यमंत्री व कुटूंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हटले, कि सार्वजनिक आरोग्य हा राज्याचा विषय असून राज्यात […]

FIR filed against Sharjeel Osmani for making provocative speech at Elgar conference
पुणे महाराष्ट्र

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात FIR दाखल

पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात पुणे पोलिसांनी FIR दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत उस्मानी याने प्रक्षोक्षक भाषण करून भावना दुखावल्याप्रकरणी गावडे यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला […]

Schools of class 5th to 10th started in Navi Mumbai
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील पाचवी ते दहावीच्या शाळा झाल्या सुरु

कोरोनाचा कहर काहीसा कमी व्हायला लागला आहे. त्यामुळे आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असून, दैनंदिन काम देखील सुरु आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रभर शाळाही हळू हळू सुरू व्हायला लागल्या आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु असून आता शहरी भागातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा उघडू लागल्या आहेत. नवी मुंबईतील पाचवी ते दहावीच्या शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांमध्ये […]

OBC creamy layer
देश

दिलासादायक : ओबीसी क्रिमी लेअरसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमी लेअरसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही अधिकृत माहिती दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर याबाबतचा विचार सुरु असल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे. सध्या ओबीसीसाठी क्रिमी लेअरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख […]

Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई

युवा शक्तीला देश सेवेकडे वळविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : देशाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलनात उपविजेतेपद पटकाविणे हे साधारण व्यक्तीचे कार्य नसून त्यासाठी देशसेवेची जिद्द आणि हिंमत लागते. अशा युवाशक्तीला देशसेवेकडे वळविण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. आता उपविजेतेपदावरच न थांबता पुढल्या काळात महाराष्ट्र अव्वल असला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्राच्या पथकाने प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन […]

CM Uddhav Thackeray gave instructions about new corona virus
महाराष्ट्र मुंबई राजकारण

परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 2 : परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे असे सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘कुलाबा कन्व्हर्सेशन’ या परिषदेत ऑनलाईन उद्घाटनपर भाषण करताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत हॅमबर्गच्या स्टेट कौन्सिलर […]

Bhagat Singh Koshyari
देश महिला विशेष

महिलांच्या कामगिरीचा उंचावणारा आलेख देशासाठी शुभलक्षण – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. २ : विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण उपस्थित राहत असलेल्या दीक्षान्त समारंभांमध्ये बहुतांशी सुवर्ण पदके विद्यार्थिनी जिंकत असतात. एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राज्याच्या दहापैकी दहाही महिला कॅडेट्सची प्रतिष्ठेच्या संचलनासाठी झालेली निवड ही तितकीच अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगून महिलांच्या कामगिरीचा सर्वच क्षेत्रांमध्ये उंचावणारा आलेख देशाकरिता शुभलक्षण आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी […]

fire broke out at a studio in Goregaon, Mumbai
महाराष्ट्र मुंबई

मुंबईच्या गोरेगाव येथील एका स्टुडिओला भीषण आग

मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील एका स्टुडिओला भीषण आग लागली आहे. शहरातील इनॉर्बिट मॉलजवळ हा स्टुडिओ आहे. आग विझविण्यासाठी आठ फायर टेंडर घटनास्थळावर दाखल झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक स्टुडिओच्या आत अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप कोणी जखमी झाल्याची नोंद झालेली नाही.

CBSE Class 10 Board Exam Time Table २०२१
शैक्षणिक

ब्रेकिंग : 10 वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Class 10 Board Exam Time Table २०२१ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आज २ फेब्रुवारी रोजी, 10 वीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत घोषणा केली आहे. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते तपासू शकतात. Date-sheet of @cbseindia29 board exams of class X. […]