पुणे : देशात एकूण ३३२१ रक्तपेढ्या आहेत पण अजूनही देशातील ६३ जिल्ह्यात एकही रक्तपेढी नसल्याचे समोर आले आहे. देशातील सर्व जिल्ह्यात किमान एक रक्तपेढी असावी याबाबत सरकारने काही पावले उचलली आहेत का? असा प्रश्न आरोग्यमंत्री व कुटूंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हटले, कि सार्वजनिक आरोग्य हा राज्याचा विषय असून राज्यात गरजेनुसार रक्तपेढी ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
रक्तपेढी नसलेले जिल्हे :
- अरुणाचल प्रदेश – १४
- आसाम : ४
- बिहार : ५
- मणिपूर : १२
- मेघालय : ४
- नागालँड : ९
राष्टीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यांना रक्तपेढी उभारणीसाठी किंवा विस्तार करण्यासाठी मदत केली जाते.. नेशनल ब्लड ट्रांसफ्यूजन काउंसिल, आरोग्य मंत्रालयाने धोरण आखले असून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रक्तपेढी असावी, असा नियम आहे. देशात रक्त पुरवठ्याबाबत एकही तक्रार आली नसल्याचे चौबे यांनी सांगितले.