पोलिओ लसीकरणादरम्यान 12 लहानग्यांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथे घडला आहे. या 12 बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुलांना उलट्या सुरु झाल्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत. मुलांना लस […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अर्थसंकल्प २०२१ : काय महागणार, काय होणार स्वस्त, जाणून घ्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. नेहमीप्रमाणे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागणार आहेत. तर काही गोष्टींवर परिणाम झालेला नाही. खरं तर, तीन वर्षांपूर्वी आलेल्या जीएसटी नंतर वस्तू आणि सेवा महाग करणं बजेटमध्ये येत नाही. आता जीएसटी 90% वस्तूंची किंमत निश्चित करते. परंतु परदेशातून आयात […]
Budget 2021 : अर्थसंकल्पाचे PDF डॉक्युमेंट कुठे आणि कसं डाऊनलोड करणार, जाणून घ्या
देशाचा अर्थसंकल्प यंदाच्या वर्षी पूर्णपणे पेपरलेस आहे. प्रथमच Android आणि iOS स्मार्टफोनसाठी स्वतंत्र युनियन बजेट अॅप बाजारात आणले गेले आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अॅप गूगल प्ले स्टोअरवर तर आयफोन वापरकर्त्यांसाठी अॅपल अॅप स्टोअरवर फ्री डाऊनलोड करता येणार आहे. केंद्र सरकारने Union Budget Mobile अॅप सुरू करण्याची घोषणा केली होती. हे अॅप Android Version 5 आणि त्यावरील […]
ब्रेकिंग : पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार, ग्राहकांवर परिणाम नाही
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार आकारला जाणार आहे. परंतु, या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.
Budget २०२१ : नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी हजारो कोटींची घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. निर्मला सीतारामन यांनी भांडवली गुंतवणूक वाढवून ५.५४ लाख कोटी रुपयांची केल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भविष्यामध्ये भारतात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा केली आहे. देशातील टू टीयर आणि वन टीयर शहरांच्या आजूबाजूच्या […]
Budget २०२१ : देशात तीन वर्षांत 7 मेगा टेक्सटाईल पार्क बनवले जातील, जाणून घ्या याविषयी..
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की देशातील कापड उद्योगाच्या निर्मितीस व निर्यातीला गती देण्यासाठी 7 मेगा टेक्सटाईल पार्क बनवले जातील. जेणेकरुन भारत या क्षेत्रात निर्यात करणारा देश होईल. हे पार्क तीन वर्षांत बनवले जातील. वस्त्रोद्योग मंत्रालयाने सात मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन आणि ऍप्रल (mega integrated textile region and apparel -MITRA) पार्क सुरू करण्याचा […]
Budget २०२१ : अर्थसंकल्पात कोरोना लसीकरणासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीकरणाविषयी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास अधिक निधी देण्यास मी वचनबद्ध आहे, असंदेखील त्या […]
विराट आणि अनुष्काच्या मुलीचे नामकरण, अनुष्काने फोटो शेअर करत सांगितले मुलीचे नाव
विराट आणि अनुष्काच्या घरी ११ जानेवारीला चिमुकलीचे आगमन झाले. विराटने इन्स्टाग्रामवर या बातमीची घोषणा केली होती. सर्वानाच विराट आणि अनुष्का आपल्या मुलीचे काय नाव ठेवतील याबाबत उत्सुकता होती. आज अनुष्काने विराट आणि तिच्या बाळासोबतचा एक फोटो शेअर करत मुलीचे नाव सांगितले. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव वामिका (Vamika) ठेवले आहे. View this post […]
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी चांगली बातमी, जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी सर्वात मोठी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला देशाचे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. वित्त मंत्रालयाने सांगितले कि, जानेवारी 2021 मध्ये रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1,19,847 लाख कोटी रुपयांचे जीएसटी (GST) संकलन झाले आहे. मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी संकलनाच्या तुलनेत 8% अधिक महसूल मिळाला आहे. पीआयबीच्या मते, जानेवारी […]
‘हा’ पत्नीचा छळ मानला जाऊ शकत नाही, नागपूर खंडपीठाचा पुन्हा वादग्रस्त निकाल
मुंबई : पत्नीकडे पैशाची मागणी करणं म्हणजे गैरवर्तन नव्हे. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 498 (ए)नुसार पतीनं पत्नीचा छळ केला असं मानलं जाऊ शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पत्नीनं केलेल्या आत्महत्येच्या आरोपातून आरोपी पतीची निर्दोष सुटका केली आहे. प्रशांत जरे यांचे साल 1995 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर 12 […]










