Budget 2021: Find out what will be more expensive, what will be cheaper

अर्थसंकल्प २०२१ : काय महागणार, काय होणार स्वस्त, जाणून घ्या

देश

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. नेहमीप्रमाणे काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागणार आहेत. तर काही गोष्टींवर परिणाम झालेला नाही. खरं तर, तीन वर्षांपूर्वी आलेल्या जीएसटी नंतर वस्तू आणि सेवा महाग करणं बजेटमध्ये येत नाही. आता जीएसटी 90% वस्तूंची किंमत निश्चित करते. परंतु परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयातीवरील शुल्काचा परिणाम होतो आणि अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाते. त्यामुळे बजेटच्या घोषणेमुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी तसेच मद्य, फुटवेअर, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, मोबाईल, रसायन, कार यासारख्या आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतींवर परिणाम होतो. केवळ यावरच सरकार आयात शुल्क वाढवते किंवा कमी करते. या अर्थसंकल्पात देखील अर्थमंत्र्यांनी हेच केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या बजेटमुळे काय महागणार :

  1. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही वाहनांच्या पार्टवरील आयात शुल्कात 15% वाढ केली आहे, त्यामुळे वाहने महाग होतील.
  2. सौर इन्व्हर्टर महाग होतील, कारण यावरील आयात शुल्कात 20% वाढ केली आहे.
  3. मोबाइल फोन चार्जर आणि हेडफोनवरील आयात शुल्कात 2.5% वाढ केली आहे. यामुळे या गोष्टी महाग होतील.

काय होणार स्वस्त :

  1. सोन्या-चांदीवरील आयात शुल्क 12.5 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे दागिने स्वस्त होतील.
  2. स्टील उत्पादनांवर आयात शुल्क 7.5% पर्यंत कमी केले आहे.
  3. तांबे उत्पादनांवर आयात शुल्क २.5 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.
  4. काही लेदर कस्टम ड्युटीमधून हटवले गेले आहेत. त्यामुळे लेदरचे सामान स्वस्त होईल.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत