The police demanded a bribe from the disabled mother to find her girl
देश

संतापजनक : मुलीला शोधण्यासाठी दिव्यांग आईकडे मागितली लाच, भीक मागून पोलिसाच्या गाडीत भरलं 12 हजारांचं डिझेल

उत्तर प्रदेश : कानपूर जिल्ह्यातील सनिगवां गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे राहणारी गुडिया नावाची दिव्यांग महिला भीक मागून उदरनिर्वाह करते. ती तिची १५ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन गेली असता तेथील पोलीस ठाण्याच्या प्रभारीने (SI) तिच्याकडे लाच मागितली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, गुडियाची 15 वर्षांची मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे. पोलिसांनी गुडियाची तक्रार नोंदवून तर घेतली, पण जेव्हा जेव्हा ती पोलिस ठाण्यात जात असे तेव्हा तिला पळवून लावलं जायचं. एक दिवस SI राजपालसिंगने गुडियाला मुलगी शोधण्याच्या बदल्यात गाडीमध्ये डिझेल भरण्यास सांगितले. मुलीला शोधण्यासाठी गुडियाने ती ऑफर स्वीकारली. ती दिवसभर भीक मागायची आणि त्या पैशातून SI राजपालसिंगच्या गाडीमध्ये डिझेल भरायची. हा प्रकार महिनाभर सुरु होता.

परंतु, मुलीला शोधण्यासाठी काहीच केलं जात नाही हे पाहून तिने शेवटी डीआयजी डॉक्टर प्रितींदरसिंग यांच्याकडे विनवणी केली. गुडियाने सांगितलं कि, तिने भीक मागून 10 ते 12 हजार रुपयांचे डिझेल SI राजपालसिंगच्या गाडीमध्ये टाकलं. त्यानंतर डीआयजी डॉक्टर प्रितींदरसिंग यांनी SI राजपालसिंग याच्यावर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणी विभागीय चौकशी केली जात आहे. गुडियाच्या मुलीला शोधण्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत