Prime Minister Modi is angry at the Congress MPs
देश राजकारण

हे जास्त होतंय, गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांवर संतापले पंतप्रधान मोदी…

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात कृषी कायद्यांचं समर्थने केलं. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर संतापलेल्या पंतप्रधानांनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना समज दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले कि, हे जास्त होतंय, मी तुमचा आदर करणारा माणूस आहे. मोदींनी […]

5 accused arrested in murder of Shiv Sainik Ramesh Shelke
महाराष्ट्र

कट्टर शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके यांच्या हत्येचा उलगडा, 5 आरोपींना अटक

जालना : जालना जिल्ह्यातील माजी सरपंच आणि कट्टर शिवसैनिक रमेश शेळके यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा अखेर जालना पोलिसांनी केला आहे. मृत रमेश शेळके यांचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके आणि त्याची पत्नी, दोन मुलं आणि इतर काहीजण अशा एकूण 9 जणांविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रमेश शेळके यांचा सख्खा भाऊ आणि त्याच्या […]

Attempts to abduct a driver in Pune at gunpointAttempts to abduct a driver in Pune at gunpoint
पुणे महाराष्ट्र

पुण्यात भरदिवसा अपहरणाचा थरार, बंदुकीचा धाक दाखवून कारचालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

पुणे : पुण्यातील पुनावळे येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्ट मागितलेल्या व्यक्तीने कार चालकाचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर सर्व्हिस रोड येथे ४४ वर्षीय व्यक्तीचा चौघांनी बंदुकीच्या धाकावर अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर कारचालकाने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. या प्रकरणी सुरेशचंद्र जोशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चार जनांविरोधात […]

The Supreme Court will hear 'that' controversial decision regarding the Pocso Act
देश

पोक्सो कायद्याबाबत ‘त्या’ वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी

नवी दिल्ली : पोक्सो कायद्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीला कपडे न काढता ‘स्किन टू स्किन’ केलेला स्पर्श लैंगिक गुन्हेगारीच्या श्रेणीत येत नाही असा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज (१० फेब्रुवारी) सुनावणी केली. दरम्यान, कोर्टाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली आहे. अलीकडेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या […]

Instructions to immediately revoke the licenses of those who adulterate food with edible oils
महाराष्ट्र

भेसळ विरोधातील मोहीम तीव्र, खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश

मुंबई : खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करून जर कुणी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. याविरोधात अन्न व औषध विभागाची मोहीम अधिक तीव्र करण्याबरोबरच खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलांमध्ये […]

Avinash Bhosale
पुणे महाराष्ट्र

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीकडून छापेमारी

पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल हाऊस या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी ८. ३० पासून अभिल कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आयबीच्या परवानगीविना विदेशी […]

Petrol, diesel prices
देश

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, दर पोहोचले विक्रमी पातळीवर.. जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलचे दर आज पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचले. तेल विपणन कंपन्यांनी केलेल्या वाढीनंतर पेट्रोलच्या किंमती आज प्रतिलिटर 29 ते 30 पैसे तर डिझेलच्या किंमती 25 ते 27 पैशांनी वाढल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर. 87.60 रुपये होती तर डिझेल 77.73 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोचले आहे. दरम्यान, मुंबईत पेट्रोल आणि […]

A huge fire broke out in a cylinder warehouse in Versova area
महाराष्ट्र मुंबई

वर्सोवा परिसरात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, ४ जण जखमी

मुंबई : वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथील सिलेंडरच्या गोदामालाच आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लागलेली आग ही लेव्हल 2 ची असून यामध्ये आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सिलेंडरच्या गोदामालाच आग लागल्यानं परिसरात […]

Actress Anita Hasanandani blessed with baby boy
मनोरंजन

अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन

अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ९ फेब्रुवारी रोजी अनिताने मुलाला जन्म दिला आहे. अनिताचा पती रोहित रेड्डीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना बाबा झाल्याची बातमी दिली.   View this post on Instagram   A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

Staring at women is also a disgrace, Aurangabad Sessions Court verdict
महाराष्ट्र

स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग, औरंगाबाद सत्र न्यायालयाचा निकाल

स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं औरंगाबाद सत्र न्यायालयानं स्पष्ट केलं. अशाच एका प्रकरणात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या रोड रोमिओला औरंगाबाद सत्र न्यायालयानं सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबाद सत्र न्यायालयानं दामोदर राबडा या आरोपीला 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. एका […]