5 accused arrested in murder of Shiv Sainik Ramesh Shelke

कट्टर शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके यांच्या हत्येचा उलगडा, 5 आरोपींना अटक

महाराष्ट्र

जालना : जालना जिल्ह्यातील माजी सरपंच आणि कट्टर शिवसैनिक रमेश शेळके यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा अखेर जालना पोलिसांनी केला आहे. मृत रमेश शेळके यांचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके आणि त्याची पत्नी, दोन मुलं आणि इतर काहीजण अशा एकूण 9 जणांविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रमेश शेळके यांचा सख्खा भाऊ आणि त्याच्या एका मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अर्जुन दंडाईत नावाच्या आरोपीने याप्रकरणी कबुली दिल्याची माहिती मिळत आहे. आरोपीला मृताच्या भावाने सुपारी दिल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत रमेश शेळके आणि मोठा भाऊ रामप्रसाद शेळके यांच्यात वडिलोपार्जित जमिनीवरून वाद होते. तसेच जमिनीचे प्रकरण 2018 पासून न्यायालयात प्रलंबित आहे. जमिनीवरून दोघा भावांमध्ये नेहमी भांडणं व्हायची. हाच धागा पकडून पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि संशयावरून आरोपींना ताब्यात घेतले असता हा संपूर्ण प्रकार समोर आला.

5 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर 4 आरोपी फरार आहेत. दरम्यान रामप्रसाद शेळके आणि त्यांच्या मुलाला आज पोलिसांनी कोर्टासमोर हजर केले होते. कोर्टाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

८ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता रमेश शेळके यांचा मृतदेह गाडीत जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत