Prime Minister Modi is angry at the Congress MPs
देश राजकारण

हे जास्त होतंय, गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांवर संतापले पंतप्रधान मोदी…

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात कृषी कायद्यांचं समर्थने केलं. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर संतापलेल्या पंतप्रधानांनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना समज दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, हे जास्त होतंय, मी तुमचा आदर करणारा माणूस आहे. मोदींनी विरोधकांना सांगितले की आतापर्यंत छोट्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालं आहे. जर छोटे शेतकरी जागे झाले तर तुम्हाला देखील उत्तर द्यावे लागेल.

हे सभागृह आणि सरकार आंदोलक शेतकऱ्यांचा आदर करतं असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. सोबतच दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलकांमध्ये अफवा परवल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदी म्हणाले की, “सातत्याने शेतकऱ्यांशी चर्चा सुरु आहे. जिथे बदलाची गरज आहे त्यावर विचारही केला. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आमचा शुद्ध हेतू आहे.”

दरम्यान, पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. सुरुवातीला काँग्रेस खासदारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी नंतर मात्र त्यांना चांगलीच समज दिली. हे योग्य नाही, आता गोंधळ थांबवा, असं मोदींनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना सांगितलं. तसंच माझ्या भाषणात अडथळे निर्माण करणं ही सुनियोजित रणनीती असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान पतंप्रधान मोदींचं भाषण सुरु असतानाच काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. यानंतर मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. “काँग्रेस न स्वत:चं भलं करु शकते ना देशाचं. काँग्रेस खासदारांची राज्यसभेत वेगळी भूमिका असते आणि लोकसभेत वेगळी भूमिका असते,” असंदेखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत