कोरोना संकटानंतर खाजगी वाहनांची गरज अधिक जाणवू लागली आणि देशात कार आणि इतर प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली. आपणही कर्जावर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर आपण बर्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कर्ज पात्रता, प्रक्रिया शुल्क, व्याज, ईएमआय यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणे सोपे होईल.
तज्ज्ञांचे मत आहे कि, कारचे मॉडेल निवडण्यापूर्वी तुम्हाला कर्जाच्या पात्रतेबद्दल माहिती मिळाली पाहिजे. म्हणजेच आपल्याला किती कर्ज मिळू शकते हे आपल्याला स्पष्टपणे माहित असायला हवं. हे आपल्या पगारावर तसेच कर्जाच्या कालावधीवरही अवलंबून असते. आपण याबद्दल विविध पोर्टलच्या मदतीने माहिती मिळवू शकता. वेगवेगळ्या बँका तुम्हाला पाच वर्ष ते सात वर्षांपर्यंतचे कार लोन देतात. येथे हे लक्षात घ्या की, दीर्घ काळासाठी कार लोन घेतल्यास आपली ईएमआय कमी होते परंतु आपल्या कारची एकूण किंमत वाढते.
कार लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या :
- जर आपण कार कर्जासाठी अर्ज करणार असाल तर सर्व प्रथम ईएमआय म्हणून आपण किती रक्कम देऊ शकता याकडे लक्ष द्या. यासाठी तुम्हाला आधीपासून चालू असलेले एखादे कर्ज तसेच तुमच्या घरातील खर्च, गुंतवणूक अशा गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. त्या आधारे आपण कारचे मॉडेल निवडू शकता.
- बँका कोणत्याही प्रकारच्या कर्जावर उत्पन्नाचे स्त्रोत, लिंग आणि क्रेडिट स्कोअर या निकषांवर व्याज आकारतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल. जर क्रेडिट स्कोर कमी असेल तर आपल्याला उच्च दरासह कर्ज मिळेल. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी आपला क्रेडिट स्कोअर तपासणे आवश्यक आहे.
- वेगवेगळ्या बँकांकडून कर्जाच्या ऑफरची तुलना करण्याची गरज असते.
- कर्ज घेताना व्याजदराबरोबरच प्रक्रिया शुल्काचा (प्रोसेसिंग फी) विचार केला पाहिजे. अनेक बँका सणासुदीच्या काळात प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) माफ करतात, परंतु आपण या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे की प्रक्रिया शुल्क माफ करण्याच्या बदल्यात बँका आपल्याकडून जास्त व्याज किंवा इतर कोणते शुल्क तर आकारत नाही ना. याखेरीज, फोरक्लोजर चार्जेस आणि प्री-पेमेंट शुल्क या सर्व बाबींची संपूर्ण माहिती मिळवायला हवी.




