Recruitment for 322 posts in Reserve Bank of India
काम-धंदा

नोकरीची सुवर्णसंधी! RBI मध्ये सहाय्यक पदाच्या 950 जागांच्या भरतीसाठी अर्जप्रक्रिया झाली सुरू

RBI Assistant recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे सहाय्यक पदभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 950 जागांवर भरती होणार आहे. RBI ने या भरतीची तपशीलवार अधिसूचना देखील जारी केली आहे. अर्ज करण्याची लिंक आरबीआयच्या www.rbi.org या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2022 आहे. पूर्वपरीक्षा २६ मार्च आणि २७ मार्च रोजी घेतली जाईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५०% गुणांसह असणे अनिवार्य आहे. ओबीसी, एससी आणि एसटीसाठी ५० टक्क्यांची अट नाही.

वयोमर्यादा : किमान 20 वर्षे, कमाल 28 वर्षे
1 फेब्रुवारी 2022 पासून वयाची गणना केली जाईल. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 फेब्रुवारी 1994 पूर्वी झालेला नसावा आणि 01 फेब्रुवारी 2002 नंतर झालेला नसावा. SC आणि ST साठी 5 वर्षांची आणि OBC साठी 3 वर्षांची सूट दिली जाईल.

वेतनमान : सुरुवातीचा मूळ पगार 20,700/- प्रति महिना असेल.
यानंतर 20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (4) – 30060 – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2850 – 55700 ची वेतनश्रेणी असेल. आणि इतर भत्ते जसे की DA, TA इ.

निवड प्रक्रिया : या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना तीन ऑनलाइन परीक्षांमधून जावे लागेल. प्राथमिक परीक्षा,
मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT).

परीक्षा पॅटर्न

  • प्राथमिक परीक्षा 100 गुणांच्या 100 प्रश्नांसह एक तासाची असेल.
    यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे 35 आणि तर्कक्षमतेतून 35 प्रश्न विचारले जातील.
  • प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील.
  • मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 200 प्रश्न विचारले जातील ज्यासाठी उमेदवारांना 135 मिनिटे मिळतील.
    यामध्ये रिझनिंग, इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरमधून 40-40 प्रश्न विचारले जातील.
  • प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.
  • मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना भाषा प्राविण्य चाचणी (LPT) मध्ये बसावे लागेल. (एलपीटी चाचणी संबंधित भागात बोलल्या जाणार्‍या स्थानिक भाषेत असेल.)
  • ऑनलाइन परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि दस्तऐवज पडताळणीत पात्र ठरल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत