Staring at women is also a disgrace, Aurangabad Sessions Court verdict
महाराष्ट्र

स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग, औरंगाबाद सत्र न्यायालयाचा निकाल

स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं औरंगाबाद सत्र न्यायालयानं स्पष्ट केलं. अशाच एका प्रकरणात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या रोड रोमिओला औरंगाबाद सत्र न्यायालयानं सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला एकटक पाहिल्याबद्दल औरंगाबाद सत्र न्यायालयानं दामोदर राबडा या आरोपीला 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास दिल्याप्रकरणी 2017 मध्ये या आरोपीला अटक करण्यात आली होती. ही मुलगी शाळेत जात असताना आरोपी सतत तिचा पाठलाग करायचा. तसेच तिच्या घरासमोरील बागेत ती सायकल चालवत असताना तिला एकटक पाहत बसायचा. ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली असता तिथंही हा रोड रोमिओ पोहोचला होता. तेव्हा या मुलीच्या मामाने मित्रांच्या मदतीनं आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

औरंगाबाद पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात एकूण 6 साक्षीदारांनी कोर्टात साक्षी दिल्या. त्यानुसार, स्त्रियांकडे एकटक पाहणं हा देखील विनयभंग असल्याचं स्पष्ट करत औरंगाबादचे विशेष कोर्टाचे न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी दामोदर राबडा या आरोपीला 6 महिने सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या निकालामुळं अशा पीडित मुलींना नक्कीच दिलासा मिळणार आहे, ज्यांना नेहमीच अशा रोड रोमिओंचा त्रास सहन करावा लागतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत