मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांच्या नियुक्तीविषयी कायद्याचे उल्लंघन करत काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे. पाच नामनिर्देशित नगरसेवकांपैकी केवळ एका नगरसेवकाच्या नियुक्तीविषयी आक्षेप असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वच नगरसेवकांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यामुळे मंत्र्यांचा ७ डिसेंबर २०२० चा स्थगिती आदेश हा उघडपणे बेकायदा आहे’, असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
खुशखबर : शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होणार
मुंबई : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठाच दिलासा दिला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होणार आहे. त्याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ मिळू शकणार आहे. मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सहकार विभाग, तसेच कृषी विभागाच्या विविध […]
गोल्डमॅन अशी ओळख असलेला सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून…
पुणे: पुणे- अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद येथे सचिन नाना शिंदे नामक गुन्हेगारावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये त्या गुन्हेगाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद भागात सचिन (वय २९, रा. लोणीकंद) हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. […]
दुःखद : तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या जेलमधून सुटका होऊन परतलेल्या हसीना बेगम यांचं निधन
औरंगाबाद : हसीना दिलशाद अहमद यांचं आज (9 फेब्रुवारी) निधन झालं. हसीना बेगम तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाल्यानंतर नुकत्याच भारतात परतल्या होत्या. औरंगाबादमध्ये वयाच्या 65 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. पासपोर्ट चोरीला गेलेल्या हसीना बेगम यांना पाकिस्तान पोलिसांनी गुप्तहेर समजून अटक केली होती. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांच्या प्रयत्नाने त्यांची तब्बल 18 वर्षांनंतर […]
ब्रेकिंग : तळोजा एमआयडीसीत आगीने घेतलं रौद्ररूप, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरली आग
मुंबई : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. ह्या आगीची भीषणता वाढली असून बाजूच्या दोन कंपन्यादेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. आग रौद्ररूप घेत असून परिसरात घबराट पसरली आहे. सध्या अग्निशमन दलाची टीम आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत फार्मा कंपन्यांना लागणारं सॉल्व्हन्ट ऑइल तयार होत असल्याची माहिती आहे. […]
तळोजा एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीत भीषण आग
मुंबई : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील एका केमिकल फॅक्टरीत आज (९ फेब्रुवारी) भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच दहा अग्निशमन गाड्या हजार झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तळोजा अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कि, त्यांना सकाळी 11.51 वाजेच्या सुमारास तळोजा एमआयडीसीत असलेल्या एझिओक्रिस्ट ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडला (Azeocryst Organics private limited) आग लागल्याची माहिती मिळाली. […]
माझ्यावरचे आरोप खोटे व अनैतिक, ‘त्या’ आरोपांवर सनी लिओनीने दिले स्पष्टीकरण
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीवर लाखो रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी लाखो रुपये घेऊनही सनीनं कार्यक्रमाला दांडी मारल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय. या सर्व प्रकरणावर आता सनीनं स्पष्टीकरण दिलं आहे. सनी लिओनी तिच्यावर कोची येथील एका इव्हेंट मॅनेजरने फसवणूकीची तक्रार दाखल केल्याने कायदेशीर अडचणीत सापडली आहे. मात्र, तिने या […]
IND vs ENG : पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका
IND vs ENG : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात पाराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर भारतीय संघाने अव्वल स्थान गमावले असून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. इंग्लंडने भारतावर विजय मिळवत या क्रमवारीत […]
ब्रेकिंग : अभिनेते राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
मुंबई : बॉलीवूड अभिनेता, निर्माता राजीव कपूर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी तातडीने जवळच्या इस्पितळात […]
मी तो भाग्यवान आहे जो कधीही पाकिस्तानला गेला नाही, निरोप घेताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले काही किस्से
राज्यसभेतील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले. आझाद यांनीही सर्वांचे आभार मानले आणि त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीतील अनुभवांचे काही किस्से सांगितले. जम्मू भागातून आलेल्या गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद […]










