A huge fire broke out in a chemical factory at Taloja MIDC
महाराष्ट्र मुंबई

तळोजा एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीत भीषण आग

मुंबई : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील एका केमिकल फॅक्टरीत आज (९ फेब्रुवारी) भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच दहा अग्निशमन गाड्या हजार झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तळोजा अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कि, त्यांना सकाळी 11.51 वाजेच्या सुमारास तळोजा एमआयडीसीत असलेल्या एझिओक्रिस्ट ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडला (Azeocryst Organics private limited) आग लागल्याची माहिती मिळाली.

केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीमुळे आत ठेवण्यात आलेल्या ड्रममध्ये स्फोट झाला आहे. सध्या अग्निशमन दलाची टीम आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत