मुंबई : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील एका केमिकल फॅक्टरीत आज (९ फेब्रुवारी) भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच दहा अग्निशमन गाड्या हजार झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तळोजा अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कि, त्यांना सकाळी 11.51 वाजेच्या सुमारास तळोजा एमआयडीसीत असलेल्या एझिओक्रिस्ट ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडला (Azeocryst Organics private limited) आग लागल्याची माहिती मिळाली. […]

