Sachin Shinde Shot Dead
पुणे महाराष्ट्र

गोल्डमॅन अशी ओळख असलेला सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून…

पुणे:  पुणे- अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद येथे सचिन नाना शिंदे नामक गुन्हेगारावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये त्या गुन्हेगाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लोणीकंद भागात सचिन (वय २९, रा. लोणीकंद) हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शिंदे हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास तो लोणीकंद येथील अक्सिस बँकेजवळ उभा होता. त्यावेळी अक्टिव्हावरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने शिंदेवर गोळी झाडली. एक गोळी शिंदे याच्या मानेजवळ लागली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. गोळीबार पूर्ववैमनस्यातून करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत