पुणे : सणसवाडी MIDC क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट दूरपर्यंत पाहायला मिळत आहेत. धुराचे लोट इतके जास्त आहेत की त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा निर्माण होत आहे. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिरूर तालुक्यातील पुणे महामार्गालगत असलेल्या सणसवाडी औद्योगिक परिसरातील एका […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दहा वर्षांच्या मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याप्रकरणी तरुणाला पाच वर्षांची शिक्षा
भारतीय संस्कृतीनुसार महिलेच्या कमरेखाली स्पर्श करणे हा तिच्या शालीनतेला धक्का आहे, असे मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाने नमूद केले. दहा वर्षांच्या मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने २२ वर्षांच्या तरुणाला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. २०१७ मध्ये आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, १० वर्षांची मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत मंदिरात जात होती. त्यावेळी […]
मोठी बातमी : उन्नाव येथील दलित मुलींच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा, एकतर्फी प्रेमातून ‘हे’ भयानक कृत्य
उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूचा पोलिसांनी खुलासा केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी सांगितले की, ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली आहे. आरोपीची या तिघींपैकी एका दलित मुलीशी ओळख होती. त्याने तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त केले होते. परंतु, तिने नकार दिल्यानंतर या मुलाने पाण्याच्या बाटलीत कीटकनाशक मिसळले आणि ते पाणी मुलीला […]
पुण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्याची तयारी सुरु, केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
पुणे शहरात तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे परिस्थितीला आळा घालण्यासाठी आतापासूनच खबरदारी घेणं गरजेचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी त्वरित आदेश काढून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिलेल्या सूचना : खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची बैठक घ्यावी. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास रुग्णांची करोना चाचणी करून घ्यावी. भाजी मंडई, दुकानदार […]
चीनने त्यांच्या मृत्यू झालेल्या जवानांची माहिती का लपवली, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं कारण..
बीजिंग : चीनने पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाला आठ महिने उलटून गेल्यानंतर त्यांच्या ठार झालेल्या सैनिकांची नावे जाहीर केली. भारतासोबत झालेल्या संघर्षात चार लष्करी अधिकारी आणि जवान ठार झाले होते. तर, एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यांनी त्यांच्या मृत्यू झालेल्या जवानांची माहिती का लपवली होती, यावर आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देखील दिले […]
ब्रेकिंग : नारनौल येथे मोठा रेल्वे अपघात, मालगाडी उलटून 39 डब्यांचे नुकसान
हरियाणाच्या नारनौल येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज (१९ फेब्रुवारी) दुपारी रेल्वे अपघातात भिलवाराजवळ मालगाडी पलटली. या अपघातात सुमारे 39 डब्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील रेल्वे ट्रॅकही तुटलेला आहे, परंतु अपघाताचे नक्की कारण अजून समजू शकलेले नाही. ही मालगाडी रेवाडी येथून फुलेराकडे जात होती,परंतु ती भिलवारा जवळील ट्रॅकवरून उतरून उलटली आहे. […]
..कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निशाण्यावर नक्की कोण?
पारनेर : विखे घराण्याने कधीही राजकारणात सेटलमेंट केली नाही. आम्ही जनतेसाठी राजकारण करीत आहोत. सामान्य जनतेसाठी कितीही नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही, कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत. जिल्हयातील राजकीय नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे.” असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. ते जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त बोलत होते. जिल्हा बॅंक […]
भयंकर : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर
महाराष्ट्रात एका आठवड्यापासून कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याच्या गतीमध्ये 200% वाढ झाली आहे. याच कारणामुळे 7 दिवसांपासून कोरोना सक्रिय प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे की महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहे. जर ही परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणली नाही, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. गुरुवारी राज्यात विक्रमी 5,427 नवीन रुग्ण […]
RBI मध्ये विविध पदांवर भरती सुरू, जाणून घ्या..
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) नॉन-सीएसजी पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांवरील वेतनश्रेणी दरमहा पगार ७७,२०८ रुपये असेल. बँकेतील नोकरी हवी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी रिझर्व्ह बँकेने अधिसूचना जारी केली आहे. रिक्त पदे : लीगल ऑफिसर (ग्रेड-बी) – ११ पदे (वेतनश्रेणी दरमहा ७७,२०८ रुपये) व्यवस्थापक (टेक्निकल-सिव्हिल) – ०१ […]
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. आपली प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटले कि, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी […]










