train accident in narnaul haryana 39 coaches damaged relief work in progress

ब्रेकिंग : नारनौल येथे मोठा रेल्वे अपघात, मालगाडी उलटून 39 डब्यांचे नुकसान

देश

हरियाणाच्या नारनौल येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज (१९ फेब्रुवारी) दुपारी रेल्वे अपघातात भिलवाराजवळ मालगाडी पलटली. या अपघातात सुमारे 39 डब्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील रेल्वे ट्रॅकही तुटलेला आहे, परंतु अपघाताचे नक्की कारण अजून समजू शकलेले नाही. ही मालगाडी रेवाडी येथून फुलेराकडे जात होती,परंतु ती भिलवारा जवळील ट्रॅकवरून उतरून उलटली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रेल्वे अपघातामुळे सध्या या मार्गावरील गाड्यांची ये-जा थांबविण्यात आली आहे. मदतकार्य सुरू करण्यात आलं असून रेल्वे वाहतूक पथक व अन्य पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडीमध्ये एकूण ९० कंटेनर होते. अपघातानंतर हे कंटेनर सुमारे 50 मीटर खाली पडले. त्याचवेळी रेल्वे ट्रॅकही उखडला आहे. माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मदतकार्य जलद गतीने सुरू आहे. सध्यातरी कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. जुन्या रेल्वे रुळावरून मालगाडी येत होती. या ट्रॅकवर प्रवासी गाड्याही प्रवास करतात. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासन रेल्वे लाइन दुरुस्त करून सेवा पूर्ववत करण्यात व्यस्त आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत