Center issues new guidelines on corona
पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्याची तयारी सुरु, केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

पुणे शहरात तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे परिस्थितीला आळा घालण्यासाठी आतापासूनच खबरदारी घेणं गरजेचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी त्वरित आदेश काढून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी सूचना दिल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिलेल्या सूचना :

  1. खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची बैठक घ्यावी. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास रुग्णांची करोना चाचणी करून घ्यावी.
  2. भाजी मंडई, दुकानदार यांच्या ठराविक अंतराने कोरोना चाचण्या घेण्यात याव्या.
  3. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम घेताना नियमांचे काटेकोर पालन करावे.
  4. मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांना पास देताना ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच दहा वर्षाखालील लहान मुलांना पास देऊ नयेत.
  5. जिल्हयाच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास रुग्णांच्या संपर्कात असलेल्या किमान २० लोकांचा शोध घेऊन संबंधित परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करावा.
  6. मंगल कार्यालये, लॉन्स, कोचिंग क्लासेस, शाळा आणि महाविद्यालय, चित्रपटगृहे , शॉपिंग मॉल या ठिकाणांची अचानक तपासणी करून मास्क न घालणाऱ्यांकडून ५०० रुपये आणि दुसऱ्यांदा आढळल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येईल. या ठिकाणी दुसऱ्यांदा अशीच परिस्थिती आढळल्यास संबंधित ठिकाणे १५ दिवस सील करावी किंवा संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हॉस्टिपटलमध्ये असलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यात यावी. या ठिकाणी किती बेड आहेत आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत का, हे तपासून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी देशमुख यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी आदेश काढला आहे. त्यानुसार इन्सिडंट कमांडर म्हणून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलिस, नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्यावर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत