नवी दिल्ली : भारतात Samsung Galaxy M12 हा स्मार्टफोन ११ मार्च रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. ११ मार्चला दुपारी १२ वाजता होणाऱ्या एका इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनला लॉन्च करण्यात येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम 12 हा स्मार्टफोन ११ मार्च रोजी सॅमसंग डॉट कॉम, अॅमेझॉन आणि रिटेल आउटलेटवर उपलब्ध होईल. कंपनीने नवीन फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाईटही स्थापित केली […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
शेतकऱ्यांसाठी काही करू शकलो नसतो तर राजीनामा तरी दिला असता – डॉ. सुजय विखे
अहमदनगर : थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे अन्यायकारक आहे. आपण जर मंत्री असतो तर हा अन्याय सहन केला नसता. यावर काहीच करू शकलो नसतो तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा तरी दिला असता,’ असं भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. कर्डिले यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा राहुरीत डॉ. सुजय […]
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आंदोलन राज्य सरकारच्या टॅक्सविरोधात, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा निषेध करण्यासाठी सायकल रॅली काढली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. मात्र, या रॅलीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय घणाघाती टीका केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये टॅक्स लावला आहे. नाना […]
पंतप्रधान मोदी फार सरळमार्गी नेते, राष्ट्रीय एकात्मता फक्त काँग्रेसचा मक्ता नाही – संजय राऊत
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमछा घातला होता. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचून घेतली, त्यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा […]
अधिवेशन सुरु होण्याआधीच विधानभवनाशी संबंधित 25 जणांना कोरोनाची लागण
मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मात्र या अधिवेशनावर देखील कोरोनाचं सावट दिसत आहे. विधानभवनात अधिवेशन सुरु होण्याआधीच 25 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर विधानभवन येथे एकूण 3200 जणांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 25 जण कोरोना बाधित असल्याची माहिती आहे. नाना पटोले यांनी […]
गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ, महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका
मार्चच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. आज (सोमवार) पुन्हा एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली. तीन दिवसांपूर्वीच या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. एलपीजी सिलिंडरची किंमत आठवड्यात दोनदा वाढली आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढून 819 रुपये झाली आहे. गेल्या एका महिन्यात किंमतींमध्ये चार वेळा वाढ […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१ मार्च) सकाळी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. पंतप्रधानांनी ट्विटर आणि फेसबुक पेजवर ही माहिती दिली. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा आजपासून सुरू झाला. या टप्प्याची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यांनी स्वतः कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेत नागरिकांना कोरोना […]
ठरलं..! कोरोना लसीचे शुल्क निश्चित; खासगी रुग्णालयांत पण मिळणार लस
मुंबई : लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्च सुरू होत आहे. या टप्प्यात वृद्ध आणि सहआजारांच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल. सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत देण्यात येईल. तसेच खासगी रुग्णालयांतून देखील आता कोरोना लस देण्यात येणार आहे. तिच्या प्रत्येक मात्रेसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल, कोरोना प्रतिबंधासाठी लशीच्या दोन मात्रा आवश्यक असून त्यासाठी ५०० रुपये शुल्क द्यावे […]
आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी
नवी दिल्ली : भारताने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. ३१ मार्चच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर बंदीची मुदत वाढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए / Directorate General of Civil Aviation – DGCA) दिली आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहतूक आणि कुरिअर सेवा मात्र […]
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत उदयनराजे भोसले यांची रोखठोक प्रतिक्रिया…
मुंबई : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, भारतात लोकशाही आहे. लोकशाहीत आपण मतदार प्रतिनिधींची निवड करत असतो. त्यामुळे प्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला हवं. पूजा चव्हाण प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी. कायद्या समोर सर्वजण समान असतात. उदयनराजे आज मनसे अध्यक्ष […]










