Rise in the price of domestic gas cylinders once again
देश

गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ, महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका

मार्चच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे. आज (सोमवार) पुन्हा एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली. तीन दिवसांपूर्वीच या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. एलपीजी सिलिंडरची किंमत आठवड्यात दोनदा वाढली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढून 819 रुपये झाली आहे. गेल्या एका महिन्यात किंमतींमध्ये चार वेळा वाढ झाली आहे. तर 19 किलो कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती 90.50 रुपयांनी वाढल्या आहेत.

दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत 819 रुपये झाली आहे. अगोदर ही किंमत 794 रुपये होती. गेल्या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत तीन वेळा 100 रुपयांची वाढ झाली होती. गॅसची किंमत 4 फेब्रुवारीला 25 रुपये, त्यानंतर 14 फेब्रुवारीला 50 रुपयांनी आणि त्यानंतर 25 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. डिसेंबरपासून एलपीजीच्या किंमतीत 225 रुपयांची वाढ झाली आहे.

दिल्लीत आता 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 794 वरून 819 रुपयांवर गेली आहे. आता दिल्लीत या सिलिंडरची किंमत 1614 रुपये झाली आहे. तर मुंबईत आता प्रति सिलिंडर 1563.50 रुपये इतका दर झाला आहे.

सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन आपण गॅसची किंमत तपासू शकतो. कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर जाऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत