मुझफ्फरनगर : कोर्टाने एका ३० वर्षीय महिलेला सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील कोर्टाने या महिलेला दोन दिवसांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, या महिलेने दंड न भरल्यास तिला आणखी सात दिवस तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल. ही घटना २६ सप्टेंबर २०१६ रोजी घडली होती. पोलीस […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मोठी बातमी : उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरण मोहिमेसंदर्भात आक्षेप, विचारले ‘हे’ प्रश्न
नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या देशात सुरु असणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात आक्षेप नोंदवला आहे. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारबरोबरच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना देखील फटकारलं आहे. आपण आपल्या स्वत:च्या लोकांचे लसीकरण न करता लशी बाहेरच्या देशांना दान करत आहेत किंवा विकत आहोत. या बाबतीत जबाबदारी व तातडी यांची जाणीव असायला हवी, असं न्यायालयाने म्हटलं […]
रेल्वे प्रशासनाकडून कोरोनाच्या नावाखाली लूट, प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता मोजावे लागणार तिप्पट पैसे
मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट देणं बंद केलं होतं. परंतु, वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू करण्यात आलंय. पण १० रुपयांना मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता प्रवाशांना तीन पट जास्त अर्थात ३० रुपये मोजावे लागणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, […]
मस्तच! सिंगल चार्जवर 420 KM धावणारी आणि 40 मिनिटात 80 टक्के चार्ज होणारी कार.. जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
मुंबई : पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे त्यामुळे दिग्गज वाहन कंपन्या २०२१ मध्ये इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत […]
ब्रेकिंग : प्राप्तिकर विभागाच्या तपासात धक्कादायक खुलासे, फिल्म कंपन्यांनी केली 350 कोटींची कर चोरी
मुंबई : प्राप्तिकर विभाग अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित काही लोक आणि कंपन्यांवर छापे मारून त्यांची चौकशी करत आहे. प्राप्तिकर विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तपासादरम्यान या प्रॉडक्शन हाऊसच्या उत्पन्न आणि शेयरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. प्राप्तिकर विभागाने सांगितले कि, आयकर विभागाला 350 कोटी […]
रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठेच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय
अहमदनगर : रेखा जरे यांच्या खुनाला तीन महिने उलटून गेले आहेत. परंतु या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली असून बाळ बोठेच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाळ बोठेला फरार घोषित करण्याच्या मागणीचा […]
संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला
मुंबई : शिवसेना नेते संजय राठोड यांनी रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच असल्याची बाब समोर आली आणि प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करून हा राजीनामा मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला देखील आहे. […]
IND vs ENG 4th test : इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांमध्ये गुंडाळला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी आणि शेवटची कसोटी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 55 धावा केल्या. त्याचबरोबर टीम इंडियाकडून फिरकीपटू अक्षर पटेलने 4 आणि रविचंद्रन अश्विनने 3 गडी बाद केले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सशिवाय डॅन लॉरेन्सने 46, ऑली पोपने 29 आणि जॉनी […]
सरकारचा मोठा निर्णय, नोकरदारांना पीएफवर मिळेल पूर्वीइतका व्याजदर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 6 कोटीहून अधिक नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. EPFO ने पीएफ वरील व्याज दर जाहीर केला आहे. EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर कायम ठेवला आहे. पीएफवर 8.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. ईपीएफ व्याजदराबाबत निर्णय आज श्रीनगर येथे झालेल्या […]
संतापजनक : मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्यामुळे महिलेची गोळ्या घालून हत्या
मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्यामुळे महिलेला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. बिहारची राजधानी पाटणा येथे फतुहा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आशादेवी लल्लन यादव असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ललन यादवच्या अल्पवयीन मुलीची शेजारीच राहणाऱ्या चंदन कुमार या […]










