platform ticket price raised from rs 10 to rs 30
देश

रेल्वे प्रशासनाकडून कोरोनाच्या नावाखाली लूट, प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता मोजावे लागणार तिप्पट पैसे

मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट देणं बंद केलं होतं.  परंतु, वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू करण्यात आलंय. पण १० रुपयांना मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता प्रवाशांना तीन पट जास्त अर्थात ३० रुपये मोजावे लागणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांनी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर ३० रुपयांवरून ५० रुपयांवर नेण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात कमी अंतराच्या प्रवाशांच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर आता ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात येतेय. कोरोना काळात अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी ‘किंचित भाडेवाढ’ केल्याचं स्पष्टीकरण यावेळी रेल्वे प्रशासनानं दिलं होतं. रेल्वे प्रशासनाकडून करोनाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत