पुणे : राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव झपाट्याने पसरण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याचे नमूद करत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात होळी व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे शहरासाठी पालिका आयुक्तांनी अशाच प्रकारचे आदेश काढले आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आरुषी गँगरेप आणि खून प्रकरण : पॉक्सो कोर्टाने दोषींना सुनावली फाशीची शिक्षा
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मधील आरुषी गँगरेप आणि खून प्रकरणात कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पॉक्सो कोर्टाने (POCSO Court) तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या संपूर्ण घटनेने उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली होती. धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या या घटनेने देशात खळबळ उडाली होती. आरुषीचे 2 जानेवारी 2018 रोजी शिकवणीतून घरी परतत […]
थरारक : गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकवर कोसळली वीज, अडीच तासापर्यंत सुरु होते सिलिंडरचे स्फोट
राजस्थान : भिलवाडा मार्गे जाणाऱ्या जयपूर-कोटा महामार्गावर हनुमान नगर येथे मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टीकड गावच्या वळणाजवळ ट्रकवर वीज कोसळल्याने ही ट्रक अनियंत्रित होऊन पलटी झाली. ट्रकमध्ये 450 घरगुती गॅस सिलिंडर भरलेले होते. ट्रक उलटताच तिला आग लागली आणि सिलिंडरचे स्फोट व्हायला सुरुवात झाली. सुमारे अडीच तासापर्यंत एकामागे एक […]
ब्रेकिंग : बीड आणि नांदेड जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर
बीड : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक शहरात कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यात आणि नांदेड जिल्ह्यातही १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात आणि नांदेड जिल्ह्यात २६ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश जारी केले […]
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, दिला ‘हा’ सल्ला
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. तसेच सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना तुम्ही याप्रकरणी हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करत त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितले आहे. परमबीर सिंह यांनी […]
ब्रेकिंग : आमिर खानला कोरोनाची लागण
अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर सध्या स्वतःच्या घरात विलगीकरणात आहे. आमिरच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. आमिरच्या प्रवक्त्याने सांगितले कि, “आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. सर्व प्रोटोकॉलचे पालन करीत तो घरीच विलगीकरणात आहे आणि तो ठीक आहे. अलिकडच्या काळात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची चाचणी घ्यावी. तुमच्या […]
श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर, आयपीएलच्या १४व्या सीझनमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह..
पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारी पुण्यात पहिला वनडे सामना झाला. भारताने या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, फलंदाजी करताना रोहित शर्माला आणि त्यानंतर गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षणात चेंडू अडवण्याचा प्रयत्नात श्रेयस अय्यरला दुखापत झाली. श्रेयसच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत दोन वनडे सामन्यात खेळू शकणार […]
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा करोनाची लागण;
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली कि माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. गेल्या वर्षी १२ जून या दिवशी धनंजय मुंडे […]
अंगावार वीज पडल्यामुळे 5 मुलं गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे 5 मुलं अंगावार वीज पडून गंभीर जखमी झाली. अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे भिजण्यापासून वाचण्यासाठी ही मुलं झाडाखाली थांबली होती. परंतु, दुर्दैवाने ते ज्या झाडाखाली थांबले होते, तिथेच वीज पडल्यामुळे ही मुलं गंभीर जखमी झाली. या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्रस तालुक्यात दत्तापूर येथे ही मुलं बकऱ्या […]
1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना देण्यात येणार कोरोनाची लस
नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट बैठकीत कोरोना लसीकरणाबाबत अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय […]










