मुंबई : दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खाननं दिवंगत वडील इरफान खान यांचे दोन पुरस्कार स्वीकारले. इरफान यांना ‘अंग्रेजी मीडियम’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तसंच त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानंसुद्धा सन्मानित करण्यात आलं. हे पुरस्कार स्वीकारताना त्यानं सांगितलं की, हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यानं वडिलांचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी सर्वजण भावुक झाले होते. बाबिलनं […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पुण्यात धक्कादायक प्रकार, वाढदिवसाला बोलावून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
पुणे : पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन जण येत असून त्यांनाही तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत असं तिला सांगण्यात आलं. पीडितेने याला विरोध केल्यानंतर, आरोपींनी तिच्या छातीवर गोळी झाडली. परंतु, तिथे मोबाईल ठेवलेला असल्यामुळे ती […]
शरद पवार यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. नवाब मलिक म्हणाले कि, “आमचे अध्यक्ष शरद पवार […]
पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, पोलिसांना वेगळीच शंका
पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या २१ वर्षीय मुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो करुणा चिंचवडे या भाजपाच्या नगरसेविकेचा मुलगा आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास चिंचवडे यांच्या चिंचवडमधील राहत्या घरी ही […]
IND vs ENG ODI : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मिळवला रोमांचक विजय, मालिकाही २-१ ने जिंकली
IND vs ENG ODI : भारतीय संघाने आज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अतिशय रोमांचक विजय मिळवला. भारताने 7 धावांनी सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने २-१ ने मालिका देखील जिंकली. भारताची प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात झाली. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या […]
ब्रेकिंग : कानपूरमधील कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये भीषण आग
कानपूरमधील कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये रविवारी सकाळी भीषण आग लागली. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील आयसीयूमध्ये आग लागल्यानंतर सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या 50 जण रुग्णालयात अडकले असल्याची माहिती मिळत आहे. कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या इमारतीत आग लागल्यामुळे बेडसह रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या […]
ब्रेकिंग : हरियाणामध्ये भीषण अपघात, गुरुग्राम-द्वारका एक्सप्रेस वेवर उड्डाणपूल कोसळला..
गुरुग्राम : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये भीषण अपघात झाला आहे. गुरुग्राम-द्वारका द्रुतगती मार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत दोन कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे. द्वारका एक्स्प्रेस वेवरील दौलताबाद गावाजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये निर्माणाधीन उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला आहे. द्वारका एक्स्प्रेस वेवर उभारण्यात येत असलेल्या एलिव्हेटेड उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला, […]
सचिन वाझेंचे सर्व मालक चिंतेत की तो NIA ला काय सांगेल : देवेंद्र फडणवीस
नागपूर : सचिन वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की सचिन वाझें NIA ला काय सांगेल, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक का बरं चिंतेत आहेत? कारण फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये अनेक लोकांचे बिंग फुटेल. काँग्रेससह हे तिन्ही पक्ष अस्वस्थ आहेत. कारण वाझेंचे हे खरे मालक आहेत. यांनी वाझेंकडून काय काय […]
नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती भीषण, सलग तिसऱ्या दिवशी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा
नांदेड : राज्यात कोरोनाने रुग्णसंख्येप्रमाणेच मृत्यूची संख्याही वाढू लागले आहेत. नांदेडमधली स्थिती तर आणखीनच चिंताजनक झाली आहे. सलग तिस-या दिवशी नांदेडच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. नांदेडमधली गोवर्धन घाट स्मशानभूमीत दिवसभरात 17 अत्यंविधीची नोंदणी झालीय. काल याच स्मशानभूमीत 20 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. नांदेडमध्ये कोरोनाची स्थिती किती बिकट आहे याची कल्पना […]
मुलीवर आणि अल्पवयीन नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा
मुंबईतील विशेष कोर्टाने लैंगिक अपराधांविषयी संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत एका 65 वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीला त्याच्या मुलीवर आणि अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरविले आहे. पीडित महिलेने कोर्टासमोर केलेल्या निवेदनात म्हटले की ती 15 वर्षाची असल्यापासून तिचे वडील तिच्यावर बलात्कार करीत होते. पीडित महिलेने सांगितले की लग्नानंतरही ती तिच्या आई-वडिलांबरोबर […]










