सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी सांगितले कि, “आशा आहे की यावर्षी सप्टेंबरपर्यंत आमच्या कंपनीची कोविड -19 ची दुसरी लस बाजारात येईल. सिरम आणि यूएस वॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स (Covovax) या दुसर्या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे. कोव्होवॅक्स ची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोरोना स्ट्रेनविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अग्निशमन दलाच्या अधीक्षकांचा अपघाती मृत्यू, फॅशन स्ट्रीट येथील आग विझल्यानंतर निघाले होते घरी
पुणे : पीएमपी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचे अधीक्षक प्रकाश हसबे यांचा मृत्यू झाला आहे. येरवड्यातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट येथील बाजारपेठेला लागलेली आग नियंत्रणात आल्यानंतर ते घरी निघाले असताना हा अपघात झाला. फॅशन स्ट्रीट मार्केटला आग लागल्यानंतर प्रकाश हसबे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. […]
ब्रेकिंग : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. सचिनने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याला कोरोनाची काही लक्षणं जाणवल्यामुळे त्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सचिन सध्या घरीच विलगीकरणात आहे. सचिनच्या घरातील इतर सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. सचिनने म्हटलं आहे कि, “कोरोनाची काही लक्षणं जाणवल्यामुळे त्याने कोरोना चाचणी […]
आज रात्री साजरा होणार अर्थ आवर, पृथ्वीसाठी छोटंसं योगदान, जाणून घ्या…
नवी दिल्ली : दर वर्षी मार्चच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ वाजता जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी एकत्रित होतात. हा दिवस जगभर अर्थ-आवर (Earth Hour) म्हणून ओळखला जातो. यावर्षी, अर्थ आवर दिन 27 मार्च रोजी आला आहे. यानिमित्ताने जगातील 180 हून अधिक देशांतील लोक रात्री ८.30 ते ९.30 या वेळेत […]
पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग
पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली होती. या परिसरात मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे आग काही क्षणांत पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. फॅशन स्ट्रीट हे चहुबाजूनी गजबजलेले असून […]
अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण
अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. Unfortunately, I have tested positive for COVID-19. All those that have come in contact with me in the last 10 days are requested to please […]
चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्येत होतेय विक्रमी वाढ, आज राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित
राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आजही दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. […]
राहुलने शतक पूर्ण केल्यानंतर ‘खास’ शैलीत केली टीकाकारांची बोलती बंद, बघा व्हिडीओ…
Ind vs Eng 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. केएल राहुलने मालिकेच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि आज दुसर्या सामन्यात दमदार शतक ठोकले. राहुलने इंग्लंडविरुद्ध सात चौकार आणि दोन षटकारांसह 108 धावा केल्या. 114 चेंडूत राहुलने आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडविरुद्धच्या टी -20 मालिकेत राहुलला खराब फॉर्मबद्दल बऱ्याच […]
Ind vs Eng 2nd ODI : भारताने इंग्लंडपुढे ठेवले ३३७ धावांचे आव्हान, केएल राहुलचे दमदार शतक
पुणे : भारताने इंग्लंडपुढे ३३७ धावांचा आव्हान ठेवलं आहे. केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार शतक ठोकलं. कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इयान मॉर्गन जखमी असल्यामुळे संघाबाहेर असून इंग्लंडचे कर्णधारपद जोस बटलरकडे […]
पत्रकार आणि लेखक अनिल धारकर यांचं निधन
नवी दिल्ली : मुंबई आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे संस्थापक पत्रकार आणि लेखक अनिल धारकर यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुवारी मुंबईच्या रुग्णालयात बायपास सर्जरी झाली होती. ते पाच दशकांपेक्षा अधिक काळ स्तंभलेखक आणि लेखक, एक आर्किटेक्ट आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. ते मिड-डे आणि द इंडिपेंडेंट यासह अनेक […]










