the son of a corporator shot himself In Pimpri-Chinchwad
पुणे महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, पोलिसांना वेगळीच शंका

पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेच्या २१ वर्षीय मुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रसन्न शेखर चिंचवडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो करुणा चिंचवडे या भाजपाच्या नगरसेविकेचा मुलगा आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास चिंचवडे यांच्या चिंचवडमधील राहत्या घरी ही घटना घडली. रात्री नऊच्या सुमारास प्रसन्न यानं कुटुंबासोबत जेवण केलं. त्यानंतर तो स्वत:च्या खोलीत गेला आणि त्याने वडिलांच्या परवानाधारक पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी झाडल्यानंतर झालेल्या आवाजामुळे कुटुंबीयांनी प्रसन्नच्या खोलीकडं धाव घेतली. त्यानंतर प्रसन्नला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रविवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी पहाटे काळेवाडी येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसन्न याने आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, प्रसन्न हा पिस्तूलाशी खेळत असताना चुकून गोळी सुटून तर मृत्यू झाला नाही ना? तसेच ही आत्महत्या आहे की इतर काही प्रकार आहे, अशी शंका पोलिसांनी उपस्थित केली असून याचा तपास देखील चिंचवड पोलीस करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत