rabindra jadeja made 37 runs in one over with five sixes 1 four
क्रीडा

सर जडेजाची कमाल.. अखेरच्या षटकात केल्या 37 धावा, बेंगळुरूला दिले 192 धावांचे आव्हान

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत ४ बाद १९१ धावा केल्या. चेन्नईकडून जडेजाने सर्वाधिक २८ चेंडूत ६२ धावा केल्या. फाफ डुप्लेसिसने ५० धावा केल्या. तर बेंगळुरूकडून हर्षल पटेलने ३ विकेट घेतल्या. जडेजाने अखेरच्या षटकात वादळी फलंदाजी केली. त्याने फक्त २४ चेंडूत अर्धशतक झळकावले. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात […]

Sharad Pawar
महाराष्ट्र मुंबई

शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असून त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे. शरद पवार यांना बुधवारी पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची नियमित तपासणी झाली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता […]

Prime Minister Narendra Modi's
कोरोना देश राजकारण

पंतप्रधानांचा देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी ‘मन की बात’ मधून संवाद साधला आणि देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलची मतं त्याचबरोबर लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. ते म्हटले कि, कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला […]

IPL double header: Chennai-Bangalore match this afternoon, Delhi-Hyderabad match tonight
क्रीडा

IPL डबल हेडर : आज दुपारी चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात सामना, तर रात्री दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात सामना

IPL २०२१ : आज होणाऱ्या डबल हेडर सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात दुपारी ३.३० वाजता सामना रंगणार आहे. मुंबई येथे होणारा हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. तर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रात्री ७.३० वाजता सामना खेळला जाईल. विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरू संघाने हंगामात आतापर्यंतचे सर्व […]

Is it safe to get vaccinated during menstruation
कोरोना देश महाराष्ट्र महिला विशेष मुंबई

मासिक पाळी दरम्यान लस घेणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या..

मुंबई : 1 मे पासून १८ वर्षांच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होत आहे. त्यातच सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यानुसार मासिक पाळीच्या आधी आणि नंतर चार पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे अशावेळी मुलींनी लस घेणे टाळावे अशा प्रकारचा दावा करण्यात येत आहे. परंतु हा दावा खोटा आहे. हा दावा अशास्त्रीय असून यावर विश्वास […]

former hydrabad cricketer ashwin yadav passes away
क्रीडा

वेगवान गोलंदाज अश्विन यादव याचे अकाली निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

मुंबई : हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 33 वर्षांचा होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या गोलंदाजीच्या खास शैलीसाठी अश्विन यादव ओळखला जायचा. त्याच्या पश्चात पत्नी आणि त्याची तीन मुले आहेत. भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांनी अश्विनच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्विट […]

Get rid of worries about hospital expenses during Corona, health insurance is important
अर्थकारण

रुग्णालयाच्या खर्चाच्या चिंतेतून मुक्त व्हा.. आर्थिक संकटातून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवा..

आपल्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी कोणत्याही प्रकारचं आरोग्य विमा योजना कवच न घेणाऱ्या अनेकांना कोरोना महामारीने जागं केलं आहे. रुग्णालयात किती काळासाठी दाखल आहोत? यावरुन आधारित रुग्णालयाचा खर्च लाखांच्या घरात जाऊ शकतो. ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना होती त्यांच्यासाठी त्यांची विमा कंपनी रुग्णालयाचं बिल भरत होती. पण ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची विमा योजना नव्हती त्यांना मात्र आपल्याच खिशातून […]

chamoli 291 people were rescued after avalanche in chamoli
देश

Chamoli Glacier Burst : जोशीमठ येथे पुन्हा हिमस्खलन, 291 जणांना वाचवण्यात यश

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना भागात पुन्हा हिमस्खलन झालं आहे. त्याच्या कचाट्यात सापडलेल्या 291 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने ही माहिती दिली आहे. दरम्यान याठिकाणी झालेल्या नुकसानासंदर्भात प्रशासनाकडे अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र एसडीआरएफ, एनडीआरएफ यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. भाबकुंडजवळ मलेरी महामार्गही बर्फामुळे बंद असल्याचे सांगण्यात आले. रस्ता […]

FIR against former Maharashtra home minister Anil Deshmukh
महाराष्ट्र

ब्रेकिंग : अनिल देशमुखांविरुध्द गुन्हा दाखल, १० ठिकाणी सीबीआयची छापेमारी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयनं चौकशी केली. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या मुंबईत बांद्रा, वरळी तसेच नागपूर अशा १० […]

Ipl 2021 Pbks Vs Mi Punjab Kings Win By 9 Wickets
क्रीडा

IPL 2021 PBKS vs MI : मुंबईविरुद्दच्या सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय.. केएल राहुल व ख्रिस गेलची स्फोटक खेळी

चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि ख्रिस गेलच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर १७.४ षटकातच ९ विकेट राखुन शानदार विजय मिळवला. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार […]