उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना भागात पुन्हा हिमस्खलन झालं आहे. त्याच्या कचाट्यात सापडलेल्या 291 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने ही माहिती दिली आहे. दरम्यान याठिकाणी झालेल्या नुकसानासंदर्भात प्रशासनाकडे अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र एसडीआरएफ, एनडीआरएफ यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.
भाबकुंडजवळ मलेरी महामार्गही बर्फामुळे बंद असल्याचे सांगण्यात आले. रस्ता बंद पडल्यामुळे बचाव दलही घटनास्थळी पोहोचू शकले नाही. रस्त्यावरून बर्फ हटवण्याचे काम सुरू आहे. भारत-चीन सीमेवर ही घटना घडली असून गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही आयटीबीपीला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासन आणि बीआरओ यांच्या संपर्कात राहून मुख्यमंत्री अपघातावर लक्ष ठेवून आहेत.
नीती घाटी के सुमना में ग्लेशियर टूटने की सूचना मिली है। इस संबंध में मैंने एलर्ट जारी कर दिया है। मैं निरंतर जिला प्रशासन और बीआरओ के सम्पर्क में हूँ।
— Tirath Singh Rawat (@TIRATHSRAWAT) April 23, 2021




