बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी खूप लोकप्रिय आहे. सनी लिओनी चित्रपट तसेच रियलिटी शो मध्ये नेहमी दिसते. ती सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे. सनी लिओनी बर्याचदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो शेअर करते. तसेच, ती कौटुंबिक फोटो आणि व्हिडिओ शेयर करते. आता सनी लिओनीने चाहत्यांना आनंदी वैवाहिक जीवन जगण्याच्या काही टिप्स देत एक व्हिडिओ शेयर केला […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
लोकप्रिय अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन
अभिनेत्री आणि अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. ब्रह्माकुमारी शिवानी यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. कनुप्रिया खूप लोकप्रिय अँकर होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कनुप्रियाने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि सांगितलं होतं की मी रुग्णालयात दाखल आहे आणि माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. अहवालानुसार, ऑक्सिजनची पातळी […]
ब्रेकिंग : सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवले, पुढील सामन्यात संघातून बाहेर?
नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंडचा खेळाडू केन विल्यमसनला संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमले आहे. या संघाचे नेतृत्व सध्या ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर करत आहे. मात्र, या मोसमातील सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूपच खराब आहे. हैदराबाद संघाला सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हा संघ सध्या सर्वात […]
भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय, भारताला मदत करण्यात विश्व कमी पडलं – अमेरिकेचे साथरोग तज्ज्ञ डॉ. फौसी
नवी दिल्ली : भारतासारख्या देशात कोरोना साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचं मत अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी एस फौसी यांनी व्यक्त केलं आहे. भारतात काही आठवड्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊन लावलं तर परिस्थिती सुधारू शकते, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सरकारमध्ये डॉ. अँथनी फौसी मुख्य आरोग्य सल्लागार म्हणून जबाबदारी हाताळत आहेत. देशात तात्काळ […]
प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 52 वर्षीय बिक्रमजित यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. बिक्रमजित कंवरपाल यांचा जन्म हिमाचल प्रदेशात एका आर्मी ऑफिसरच्या घरात झाला होता. विक्रमजीत स्वतः देखील सैन्यात नोकरीस […]
कर्ज घेण्याचं प्रमाण झालं कमी, कर्जवितरण वाढवण्यासाठी RBI चे प्रयत्न सुरु
नवी दिल्ली : बँकिंग कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झालं असून कोरोनाची दुसरी लाट त्याला आणखी खाली आणू शकते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याबाबत शुक्रवारी केंद्रीय बँकेच्या उच्चस्तरीय संघाने देशाच्या लघु वित्त बँकांशी (SFB) बैठक घेतली. यामध्ये सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजातील विविध घटकांना कर्ज वितरण करण्याचा विचार केला गेला. रिझर्व्ह बँक लवकरच […]
अग्नितांडव! कोविड सेंटरला लागलेल्या आगीत २ नर्ससह १६ जणांचा मृत्यू…
गुजरात : गुजरातमधील भरूच परिसरात पटेल वेलफेअर रुग्णालयातच कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर बनवण्यात आलं होतं. त्या कोविड सेंटरला शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू करण्यात आलं. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ रुग्णांचा आणि २ नर्सचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी […]
येत्या २-३ दिवसांत कोरोनाचा संसर्ग पोहोचणार शिगेला..
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग ३ ते ५ मे दरम्यान शिगेला पोहोचू शकतो, असा अंदाज केंद्र सरकारने नेमलेल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. देशात शुक्रवारी कोरोना […]
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर मोठं संकट, होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास!
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट जगभरात आलेली असताना ऑस्ट्रेलियाने अतिशय सावध पण कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतणं अवघड होणार आहे. ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्टनुसार मायदेशी परतल्यानंतर आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जाईल. तसंच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंडही घेतला जाईल. एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर त्यांना जेलही […]
दिलासादायक : तुम्ही एकदा कोरोनातून बरे झाले आहात? तर संशोधनात समोर आलेली ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची…
नवी दिल्ली : एका संशोधनात भारताच्या दृष्टीने एक दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन बऱ्या झालेल्या लोकांना कोरोना लसीचा केवळ एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून समोर आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या कठीण काळात ही बाब काहीशी चिंता कमी करणारीच म्हणावी लागेल. या पार्श्वभूमीवर […]










