It will be possible to empower tribals through mahua flowers - Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई

मोहफुल उत्पादनातून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ प्रकल्प राबविणार

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ हा प्रकल्प राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वन धन केंद्रामार्फत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ हा प्रकल्प राबविणार आहे. आदिवासी कुटुंबाचे सशक्तीकरण व्हावे आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी हा प्रकल्प राबविण्यासाठी […]

MTDC is getting ready to serve tourists after the ban, online training for staff
महाराष्ट्र मुंबई

प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण

मुंबई : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (Maharashtra Tourism Development Corporation -MTDC) पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर आता सध्याच्या प्रतिबंधात्मक कालावधीत एमटीडीसीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या संकल्पनेतून आणि उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या […]

Martyred Jawan Jijabhau Mohite Cremated With Full Military Honours In His Village
देश महाराष्ट्र

शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांना अखेरचा निरोप

परभणी : भारतीय हवाई दलातील जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता पूर्णा तालुक्यातील महागाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जिजाभाऊ यांच्या कुटुंबीयांनी धार्मिक रीतीनुसार अंत्यविधी पूर्ण केला. पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. तसंच, हवाई दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी, शहीद जिजाभाऊचे […]

Mehul Choksi's photo inside the jail goes viral on social media
ग्लोबल देश

मेहुल चोकसी याचे तुरुंगातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : PNB घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोकसी सध्या डॉमिनिका देशाच्या तुरुंगात पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, त्याचे तुरुंगातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये चोकसीच्या डोळ्याला इजा असून हातावर जखमा झालेल्या आहेत. या फोटोमध्ये मेहुल चोकसी घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. डॉमिनिका पोलिसांकडून चोकसी याची चौकशी सुरु आहे. तर कोर्टाकडून चोकसीला कायदेशीर मदत नाकारण्यात आली […]

Sanjay Raut Targets Narendra Modi Over Toolkit
देश महाराष्ट्र राजकारण

‘हा’ काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी व भाजपवर सणसणीत टीका

मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपनं २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करून जिंकल्या. विरोधकांवर यथेच्छ चिखलफेक केली. आता या सोशल मीडियामध्ये कोरोना हाताळणीसंदर्भात नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची बदनामी होत आहे. हा काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे,’ अशी सणसणीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपनं आरोप […]

Marathi Actor Bhushan Kadu's Wife Kadambari Passes Away Due To Corona
महाराष्ट्र मुंबई

अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांचं निधन झालं आहे. त्या ३९ वर्षांच्या होत्या. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात […]

Pm
कोरोना देश राजकारण

मोठी घोषणा; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना नि:शुल्क शिक्षण, १० लाख रुपये आर्थिक मदत, मोफत आरोग्य विमा आणि बरेच काही…

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. नि:शुल्क शिक्षणासह त्या मुलांच्या वयाच्या २३ व्या वर्षी १० लाख रुपये आर्थिक मदतही दिली जाणार आहे. तसेच मुलांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल. हा सर्व खर्चा पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन फंडातून केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये लिहितात […]

Blood donation camp at Talegaon Dabhade (Pune) on the occasion of Republic Day
पुणे महाराष्ट्र रक्‍तदान

रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा आणि गरजू रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान द्या – राहुल पारगे

पुणे : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. राज्यातील विविध रुग्णालये आणि रक्तपेढींमधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. नेहमीच मे-जून दरम्यान सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो, अनेक तरुणांना रक्तदान  करण्याची इच्छा असूनही महाविद्यालय बंद असल्याकारणाने रक्तदान करता येत नाही, तसेच कारखाने, विविध छोटे उद्योग धंदे हे देखील रक्तदान चळवळी मध्ये अग्रणण्याने […]

Alcohol given to a friend's one and a half year old baby, health is critical
देश

संतापजनक! मित्राच्या दीड वर्षाच्या बाळाला पाजली दारू, प्रकृती चिंताजनक

भोपाळ : एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या दीड वर्षाच्या निरागस बाळाला दारू पाजल्याची संतापजनक घटना घडली आहे. भोपाळ शहरातील अशोका गार्डन पोलिस स्टेशन परिसरातील रूप नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. दारू पाजल्यामुळे या बाळाची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून […]

filmmaker Ryan Stephen dies due to corona
मनोरंजन

बॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का, चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय फक्त 50 वर्षे होते. रायन यांना कोरोनाची संसर्ग झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर इंडस्ट्रीमधील त्याच्या खास मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. रायन स्टीफन यांच्या मृत्यूची बातमी […]