जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी नितिका कौल आज भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’ बनल्या आहेत. नितीका यांनी आज भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून हुतात्मा मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली. मेजर विभूती फेब्रुवारी 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
IPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने UAE मध्ये होणार, BCCI चा मोठा निर्णय
मुंबई : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगबाबत (IPL) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता यूएईमध्ये होणार आहेत. आयपीएलचे 31 सामने खेळायचे राहिले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवण्यात आली होती. NEWS ? […]
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त आरक्षण रद्द, राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय सुनावला आहे. त्याबाबत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. याअगोदर, महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषद कायद्याचा कलम १२ […]
नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने, मराठा आरक्षणाबाबत संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पुढे काय करावं लागेल, याबाबतही राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं कि, “संभाजीराजे […]
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनुभव व धड्यांच्या आधारे सुयोग्य नियोजन करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘हे’ निर्देश
मुंबई : ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उपायांची अधिक प्रभावी कार्यवाही व्हावी आणि नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत, यादृष्टीने पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव व धड्यांच्या आधारावर सुयोग्य नियोजन आराखडा बनवण्यासाठी आणखी एक स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचा विचार करावा,’ असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहेत. कोरोनाविषयक जनहित याचिकांविषयीच्या सुनावणीनंतर न्या. अमजद […]
हृदयद्रावक : आई वडिलांच्या भांडणात २ चिमुकल्यांचा मनाला चटका लावणारा अंत…
बारामती : कधी कधी भांडणाचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, हे दाखवणारी एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेने आत्महत्या करण्यासाठी गावाबाहेर असणाऱ्या खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतली. हा प्रकार पाहून आईला वाचवण्यासाठी दोन चिमुकल्या मुलांनी देखील पाण्यात उडी घेतली, परंतु, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आईला मात्र पतीने सुखरूप […]
मी एकाच वेळी आठ-आठ खाती सांभाळली, तुम्ही मला शिकवू नका, हिंमत असेल तर…
कोल्हापूर: एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे…अशा घोषणा देत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मी एकाच वेळी आठ-आठ खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे, त्यामुळे मला शिकवू नका… निर्णय घ्यायचा असेल तर कोणत्याही क्षणी घेऊ शकता, त्यामुळे हिंमत असेल तर दोन दिवसात विशेष […]
एअर इंडियाच्या विमानात वटवाघूळ आढळल्याने केली इमर्जन्सी लँडींग, पण तोपर्यंत…
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर AI-105 या विमानाने शुक्रवारी २.२० मिनिटांनी दिल्लीहून अमेरिकेच्या न्यूजर्सीसाठी उड्डाण केले. मात्र या विमानात वटवाघूळ आढळल्याने मोठी खळबळ उडाली. विमानाने उड्डाण केल्यानंतर जवळपास ३० मिनिटांनी पॅसेंजर एरियात वटवाघूळ आढळून आले. यामुळे हे विमान तात्काळ माघारी फिरवून दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. शुक्रवारच्या पहाटे ३.५५ मिनिटांनी या विमानाचे दिल्ली विमानतळार […]
संतापजनक : किरकोळ कारणावरून दलित मजुराच्या कुटुंबीयांचे अपहरण, गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार
छत्तरपूर : मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका दलित मजुराला शेतावर काम करायला बोलावल्यानंतर त्याला झाड तोडण्यास सांगितले, परंतु त्याने झाड तोडण्यास नकार दिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान तो निसटून पळून गेल्यानंतर या गुंडांनी थेट त्याच्या घरी पोहोचून त्याची गरोदर पत्नी, दोन मुले आणि आईलाही मारहाण केली. त्यानंतर त्या सर्वांचे अपहरण […]
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, 5 जणांचा मृत्यू
ठाणे : उल्हासनगर येथील नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोरील साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी ३ ते ४ व्यक्ती अडकल्या असल्याचा अंदाज असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. साई सिद्धी या इमारतीच्या पाचव्या मजल्यापासून ते […]










