मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पुढे काय करावं लागेल, याबाबतही राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं कि, “संभाजीराजे छत्रपती हे महाराष्ट्रातील एक सन्माननीय नेते आहेत. सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याने सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदर आहे. तसंच मराठा आरक्षणाबाबत त्यांनी जो संताप व्यक्त केला त्या भूमिकेशी सर्वच राजकीय पक्ष सहमत आहेत. संभाजीराजे राज्यातील प्रमुख नेत्यांना भेटले. त्यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पण आता पंतप्रधान मोदी यांच्यासोबत प्रमुख बैठक असायला हवी. कारण हा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिला नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा प्रश्न केंद्राकडे गेला आहे. त्यामुळे आपण सर्वजण पंतप्रधानांकडे जाऊ. नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने आहेत, त्यांनी ती टाकावीत. महाराष्ट्र सरकार एकमुखाने संभाजीराजे छत्रपती यांच्या चळवळीच्या सोबत आहे.”
मी एकाच वेळी आठ-आठ खाती सांभाळली, तुम्ही मला शिकवू नका, हिंमत असेल तर…




