5 killed in Ulhasnagar building slab collapse
ठाणे महाराष्ट्र

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना, 5 जणांचा मृत्यू

ठाणे : उल्हासनगर येथील  नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोरील साई सिद्धी या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी ३ ते ४ व्यक्ती अडकल्या असल्याचा अंदाज असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

साई सिद्धी या इमारतीच्या पाचव्या मजल्यापासून ते पहिल्या मजल्यापर्यंतचा स्लॅब कोसळला आहे. ही घटना आज रात्री ९ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम रवाना झाली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत