The rapid increase in the number of corona patients in Pune

भयंकर : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, आरोग्य प्रशासन देखील धास्तावले

पुणे महाराष्ट्र

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. पुण्यात आज (23 फेब्रुवारी) दुपारपर्यंतच तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये संध्याकाळपर्यंत आणखी काही रुग्णांची भर पडण्याची शक्यता आहे. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. काल (सोमवार) 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर आज कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने पुण्यात अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुण्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे या आकडेवारीवरुन दिसत आहे. ह्या आकडेवारीमुळे आरोग्य प्रशासन देखील धास्तावले आहे. त्यामुळे पुण्यात आणखी कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे सरकारकडून वेगवेगळे प्रतिबंध घातले जात आहेत. तसेच, नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहनही केले जात आहे. मात्र, पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोनावर लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी ते येथील आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेत आहेत. तसेच हॉटेल, बार, रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंतच खुले ठेवण्याची परवानगी आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी 28 फेब्रवारी पर्यंत शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत