Sanjay Raut Targets Narendra Modi Over Toolkit
देश महाराष्ट्र राजकारण

‘हा’ काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी व भाजपवर सणसणीत टीका

मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपनं २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करून जिंकल्या. विरोधकांवर यथेच्छ चिखलफेक केली. आता या सोशल मीडियामध्ये कोरोना हाताळणीसंदर्भात नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची बदनामी होत आहे. हा काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे,’ अशी सणसणीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भाजपनं आरोप केला आहे की पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्यासाठी काँग्रेसनं एक ‘टूलकिट’ निर्माण केलं. पंतप्रधान मोदी तसेच कोरोना लढ्यातील सरकारचं अपयश याबाबत कोणी काय लिहायचं, कधी कोणत्या वेळेस काय बोलायचं, कोणत्या माध्यमांवर काय बोलायचं, याबाबतची ‘कामं’ वाटून देणारी एक यादी काँग्रेसनं केली होती. मात्र, भाजपचा हा आरोप म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे, अशी टीका राऊत यांनी सामनातील लेखामधून केली आहे.

राऊत म्हणाले की “गंगेत प्रेते तरंगत आहेत. त्या प्रेतांचे फोटो व देशभरात पेटलेल्या चितांचे भडाग्नी जागतिक मीडियानं दाखवले. गंगेच्या किनाऱ्यावरील प्रेतांचे फोटो ‘ड्रोन’च्या माध्यमातून, आकाशातून काढले. ते ट्विटरसह सगळ्याच माध्यमांनी छापले. त्यामुळे भाजपचे लोक समाजमाध्यमांवर येऊन जी सारवासारव करत आहेत व काँग्रेसवर आरोप करत आहेत, त्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. ‘खोटं’ स्वीकारण्याची मर्यादा संपली आहे. सर्व खरे-खोटे पसरविण्यासाठी याच ‘ट्विटर’चा वारेमाप वापर आतापर्यंत भाजपनं केला. २०१४ चे राजकीय युद्ध भाजपने ‘ट्विटर’सह सोशल मीडियाच्या फौजांच्या बळावर जिंकले. त्यासाठी ‘आयटी’ सेल उभे करून हजारो कोटी रुपये ओतले. इतर राजकीय पक्षांनाही त्यामुळं स्वतःचे आयटी सेल उभे करावे लागले. जे लोक मोदी यांच्या बदनामीचा मुद्दा उचलत आहेत त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. सहा महिन्यांपासून जे किसान आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन परदेशी पैशांवर सुरू आहे, त्या आंदोलनात खलिस्तानी अतिरेकी घुसले आहेत, या बदनामीच्या ‘टुलकिट’चे सूत्रधार कोण होते?”

राऊत पुढे म्हणाले की सोशल मीडियावर व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याच्या स्वैराचारानं आज धुमाकूळ घातला आहे. त्यावर नियंत्रण हवेच, पण या माध्यमांवर संपूर्ण बंदी आणणं योग्य नाही. भाजपनं ट्विटर, टुलकिट वगैरेंबाबत उपस्थित केलेले मुद्दे चुकीचे आहेत असं नाही. प्रत्येकाची प्रतिष्ठा हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असतोच. पण भाजपच्या पुढाऱ्यांनी हा युक्तिवाद करणं हे त्यांच्या पूर्वीच्या कृतीशी सुसंगत नाही.

नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने, मराठा आरक्षणाबाबत संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत