दिल्ली : पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्या म्हणण्यानुसार दिल्ली सरकारने फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि फोडण्यावरील बंदी 1 जानेवारी 2023 पर्यंत वाढवली आहे. ते पुढे म्हणाले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिल्ली पोलिस, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) आणि महसूल विभागाकडून कठोर कारवाई केली जाईल.
दिल्ली में लोगों को प्रदूषण के खतरे से बचाने के लिए पिछले साल की तरह ही इस बार भी सभी तरह के पटाखों के उत्पादन, भंडारण, बिक्री और उपयोग पर पूरी तरह प्रतिबंध लगाया जा रहा है, तांकि लोगों की जिंदगी बचाई जा सके।
— Gopal Rai (@AapKaGopalRai) September 7, 2022
गोपाल राय यांनी ट्विट केले कि, “लोकांचे जीवन वाचवता यावे यासाठी सर्व प्रकारच्या फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.” राय म्हणाले की फटाक्यांच्या ऑनलाइन विक्रीवर देखील बंदी घालण्यात येईल आणि बंदीची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दिल्ली पोलिस, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती आणि महसूल विभाग यांच्याशी चर्चा केल्यानंतर कृती योजना तयार केली जाईल.
दिल्ली सरकारने गेल्या दिवाळीतही वायू प्रदूषणाच्या चिंताजनक पातळीच्या चिंतेमुळे फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घातली होती.




