father killed seven year old son police arrested
देश

बकऱ्यांचा बळी देताना चुकून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू, दुर्गापूजेदरम्यान घडली भयंकर घटना

झारखंड : झारखंड मधील गुमला येथे बकऱ्याचा बळी देण्याऐवजी एका 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले, त्यानंतर मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

झारखंड मधील गुमला जिल्ह्यातील घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालपूर गावात ही घटना घडली. मंगळवारी महानवमीनिमित्त गावातील देवी मंडपात एकामागून एक बोकडांचा सार्वजनिक बळी दिला जात होता. यादरम्यान धारदार शस्त्राने 4 वर्षीय बालक विमल ओराव याच्या अंगावर वार झाला. यात बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला घाघरा सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र वाटेतच बालकाचा मृत्यू झाला.

येथील प्रत्येक गावात दुर्गापूजेदरम्यान देवी मंडपात बकऱ्यांचा बळी देण्याची परंपरा आहे. मंगळवारी घटनेपूर्वी दोन बकऱ्यांचा बळी दिला गेला. त्यानंतर तिसर्‍या बकऱ्याच्या मानेवर वार करताना धारदार शस्त्राचा भाग तुटून गर्दीत उभ्या असलेल्या विमल दीपक ओराव या 4 वर्षांच्या मुलाच्या छातीवर आदळला. या घटनेत मुलाला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच घाघरा पोलिस ठाण्याचे प्रभारी अमित चौधरी पथकासह गावात पोहोचले. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी गुमला सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तर, मृत विमल ओरावची आई बिरसी देवी आणि वडील दीपक ओराव यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत