क्राईम देश

‘पप्पा माझ्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याचा बदला नक्की घ्या’, असे सांगून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलीने घरातील एका खोलीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ‘पप्पा, रुस्तम माझ्या मृत्यूला जबाबदार आहे, त्याने माझ्याबरोबर गैरवर्तन केले आहे, पप्पा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला नक्की घ्या.’

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, तीन जणांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रुस्तमच्या अटकेसाठी पोलीस सातत्याने छापे टाकत आहेत. या घटनेनंतर परिसरात निर्माण झालेला तणाव पाहता मोठ्या प्रमाणावर पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जौनपूर जिल्ह्यातील सुरेरी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला काही तरुण नेहमी त्रास द्यायचे. या गोष्टीवरून ती खूप अस्वस्थ असायची. ही मुलगी मंगळवारी रात्री खोलीत झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बराच वेळ झाला तरीही खोलीतून बाहेर आली नाही, त्यामुळे तिच्या आईने दरवाजा उघडला, तेव्हा तिने बघितले की मुलीने साडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे पाहून मुलीच्या आईने आरडाओरड केली. आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य तिथे जमा झाले. त्यानंतर त्यांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली, ज्यात मुलीने लिहिले आहे की, ‘पप्पा, रुस्तम माझ्या मृत्यूला जबाबदार आहे, त्याने माझ्याबरोबर गैरवर्तन केले आहे, पप्पा तुम्ही माझ्या मृत्यूचा बदला नक्की घ्या.’

घटनेची माहिती मिळताच क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि पीएसी दलही घटनास्थळी पोहोचले. मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुस्तमसह तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. रुस्तमचा शोध घेण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत