मुंबई : अभिनेत्री तरला जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ यासह अनेक मालिकांमध्ये त्यांनी भूमिका निभावल्या आहेत. अभिनेत्री निया शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. नियाने तरला जोशी यांच्यासोबत ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेत काम […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
काही मिनिटात कळेल सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, वापरा ‘ही’ सोपी पद्धत
आजकालच्या दैनंदिन जीवनात एलपीजी सिलिंडर ही आपली एक मूलभूत गरज बनली आहे. विशेषत: शहरांमध्ये राहणारे लोक स्वयंपाकासाठी पूर्णपणे एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, अचानक रात्री किंवा धावपळीच्या वेळी सिलिंडर संपल्यास तो भरण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि त्यामुळे आपल्यासमोर अडचण निर्माण होते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण आज एक उपाय जाणून घेऊ. त्यामुळे आपल्या सिलिंडरमध्ये किती […]
‘त्या’ तरुणांना पळता भुई थोडी… रोजच्या छेडछाडीला कंटाळून मुलींनी दिला चोप
राजस्थान : राजस्थानमधील अलवर येथील हमीरपूर गावात काही मुलींनी छेडछाड करणाऱ्या तरुणांना चोप दिल्याची घटना घडली आहे. रोज-रोज होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून या मुलींनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना अलवर जिल्ह्यातील हरसौरा पोलिस स्टेशन परिसरातील हमीरपूर गावातील आहे. काही तरुणांच्या दररोजच्या छेडछाडीमुळे त्रस्त झालेल्या मुलींनी या तरुणांना चांगलाच धडा शिकवला आहे. या मुलींनी […]
कोवॅक्सिनपेक्षा कोविशील्ड लस शरीरात तयार करते जास्त अँटीबॉडीज, संशोधनात झाला खुलासा
नवी दिल्ली : शरीरात कोरोना विषाणूविरूद्ध अँटीबॉडीज तयार करण्यासाठी कोवॅक्सिनपेक्षा कोविशील्ड अधिक प्रभावी असल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून निष्कर्ष निघाला की कोविशील्ड मानवी शरीरात जास्त अँटीबॉडीज तयार करते. कोरोना व्हायरस प्रेरित अँटी बॉडीज टीट्रे (Coronavirus Vaccine-induced Antibody Titre -COVAT) यांनी हा अभ्यास केला आहे. या संशोधनात कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचे दोन्ही डोस […]
तीन भावंडं आणि पाळीव कुत्र्याचा कालव्यात बुडून मृत्यू, एक फोन आल्याने अनर्थ घडला…
सांगली : सांगलीतील आटपाडी तालुक्यात घाणंद या गावात तीन भावंडांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. ही तीनही भावंडं कालव्यावर मासेमारीसाठी गेली होती. या घटनेत त्यांचा पाळीव कुत्राही वाहून गेला, त्याचा मृतदेह सापडला आहे. या तीन भावंडांपैकी एकाचा मृतदेह सकाळी सापडला असून दोन […]
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी पास लागेल का? जाणून घ्या…
मुंबई : राज्य सरकारने आजपासून नवी नियमावली लागू केली असून राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अनलॉक प्रक्रियेबाबत शासकीय स्तरावर निर्णय घेतला असला तरी स्थानिक प्रशासनाला निर्बंध हटवायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. मात्र एका जिल्ह्यातून […]
पाकिस्तानमध्ये रेल्वेची मोठी दुर्घटना , सिंधमध्ये दोन एक्सप्रेसची टक्कर, आतापर्यंत 30 ठार
पाकिस्तान : पाकिस्तानमध्ये आज (७ जून) पहाटे एक मोठा रेल्वे दुर्घटना झाली आहे. सिंधमधील डार्की, घोटकी दोन गाड्यांची टक्कर झाली असून, या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेस दरम्यान झालेल्या धडकेत अनेक लोकांचे प्राण गमावण्याची भीती […]
वांद्र्यात इमारतीचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू, ४ जखमी..
मुंबई : वांद्र्यात एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यात एका जणाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव व मदत कार्य सुरु केले आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्विट करत म्हटले कि, मलब्याखाली आणखी […]
तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना देवलापार येथे घडली आहे. देवलापार पोलिसांनी या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप या तरुणाला अटक करण्यात आलेली नाही. वैभव राऊत (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. वैभव हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रसचे तालुका अध्यक्ष कैलास […]
निर्बंध शिथील केलेले नाहीत, वेळ पडल्यास निर्बंध कडक करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरच्या अनलॉक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध भूमिकेत असून त्यांनी प्रशासनाला कठोर सूचना दिल्या आहेत. कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच लेव्हल्स ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत […]










