travel pass checking in lockdown in maharashtra
महाराष्ट्र मुंबई

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी पास लागेल का? जाणून घ्या…

मुंबई : राज्य सरकारने आजपासून नवी नियमावली लागू केली असून राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अनलॉक प्रक्रियेबाबत शासकीय स्तरावर निर्णय घेतला असला तरी स्थानिक प्रशासनाला निर्बंध हटवायचे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. मात्र एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी ई-पास लागेल का? याबाबत अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सरकारने स्पष्ट केले आहे की, पहिल्या ४ टप्प्यांमध्ये प्रवास करत असाल तर नियमितपणे वाहतूक सुरू आहे. केवळ ५ व्या टप्प्यातून तुम्ही प्रवास करणार असाल तर त्यासाठी ई पास आवश्यक आहे. सध्यातरी ५ व्या टप्प्यात एकाही जिल्ह्याचा समावेश नाही. पाचव्या स्तरात जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल अशा जिल्ह्यांचा समावेश होईल.

निर्बंध शिथील केलेले नाहीत, वेळ पडल्यास निर्बंध कडक करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

पहिल्या टप्प्यात नियमितपणे लोकलने प्रवास करू शकता, परंतु स्थानिक प्रशासन त्यांच्या स्तरावर निर्बंध लागू करू शकतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात वैद्यकीय व अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल. स्थानिक प्रशासनाच्या नियमांनुसार महिलांनाही प्रवेशास मुभा देण्यात आली आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्तरात केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा आहे.

पहिल्या टप्प्यात नियमितपणे सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात १०० टक्के वाहतूक सुरू राहील, परंतु उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही. तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात ५० टक्के सार्वजनिक वाहतूक सुरू राहील. माल वाहतूक करण्यासाठी ३ जणांना परवानगी असेल. पाचव्या टप्प्यात माल वाहतूक करण्यासाठी ई पासची आवश्यकता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत