Filed a case against the son of a former Zilla Parishad member for abusing a young woman
नागपूर महाराष्ट्र

तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या मुलाने तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना देवलापार येथे घडली आहे. देवलापार पोलिसांनी या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप या तरुणाला अटक करण्यात आलेली नाही. वैभव राऊत (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वैभव हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व काँग्रसचे तालुका अध्यक्ष कैलास राऊत यांचा मुलगा आहे. वैभव याने देवलापार परिसरात राहणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने तिला एका रिसॉर्टवर नेले. तेथे तिला चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याने मोबाइलद्वारे तरुणीची अश्लील चित्रफित तयार केली. त्यानंतर ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन वैभव याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

काही दिवसांपूर्वी तरुणीने देवलापार पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, त्याला अटक न करण्यासाठी दबाव दिला जात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत