मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. ती चूकच होती. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती. पण त्याचा पश्चाताप होत नाही, अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
बाळाचा 14 व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू, आई-वडिल मात्र मद्यपान करण्यात मश्गुल
रशिया : एका जोडप्याला मद्यपान करताना दाखवलेला बेजबाबदारपणा चांगलाच महागात पडला. या जोडप्याने आपल्या 21 महिन्यांच्या मुलाच्या पलंगालगतची खिडकी उघडी ठेवली होती आणि ते दोघे मद्यपान करत होते. यादरम्यान, हे बाळ बेडवर खेळता-खेळता थेट 14 व्या मजल्यावरून खाली कोसळलं. विशेष म्हणजे या जोडप्याला बाळाचा खाली पडून मृत्यू झाल्याचं देखील समजलं नाही. पोलिसांनी दाराची बेल वाजवून […]
धक्कादायक! महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून बलात्कार
वाशिम : वाशिममध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तिच्याच घरात घुसून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा वाशिम शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकाविरुद्धच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे. गुन्हा दाखल केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव विश्वकांत गुट्टे […]
जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरण संरक्षण आवश्यक, जाणून घ्या हवामान बदलाच्या धोक्यात भारताची स्थिती..
नवी दिल्ली : प्रत्येक छोट्या-मोठ्या गरजांसाठी आपण पर्यावरण आणि निसर्गावर अवलंबून आहोत, तरीही जगभरातील देश पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडे सर्वाधिक दुर्लक्ष करतात. कोरोना महामारीने ज्याप्रमाणे वेगाने धावणाऱ्या जगाला थांबवलं, तो मानवजातीला पर्यावरणाने दिलेला एकप्रकारचा इशाराच आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (United Nations Environment Programme – UNEP), वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि द इकोनोमिक्स ऑफ लँड […]
अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याबरोबर पळून गेलेल्या ‘त्या’ शिक्षिकेला अटक
हरियाणा : काही दिवसांपूर्वी एक शिक्षिका अकरावीच्या एका विद्यार्थ्याबरोबर पळून गेली होती. त्यानंतर देशभर या प्रकरणावर बरीच चर्चा झाली होती. या प्रकरणानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी महिला शिक्षिकेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पानिपत पोलिसांनी महिला शिक्षिकेला सायबर सेलच्या मदतीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील पानिपत येथील एक महिला शिक्षिका घरी एकटीच राहत होती. तिच्या […]
गुजरातमध्ये लव्ह जिहाद कायदा होणार लागू, जाणून घ्या या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद
गुजरात : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लव्ह जिहाद कायद्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार, जबरदस्तीने धर्मांतर करणार्यांवर आणि फसवणूक करुन विवाह करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 15 जूनपासून गुजरात राज्यात हा कायदा लागू होणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. लव्ह जिहाद विधेयक गुजरात विधानसभेत जोरदार गदारोळात पारित झाले. गुजरातचे राज्यपाल आचार्य […]
ट्विटरने मान्य केली चूक, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक परत
नवी दिल्ली : ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक (निळ्या रंगाचं चिन्ह) पुनर्संचयित केली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे वैयक्तिक ट्विटर अकाउंट पुन्हा ‘सत्यापित’ (Verified) झाले आहे. ब्लू टीक हटवल्यानंतर काही तासातच ट्विटरने पुन्हा ब्लू टीक परत केली आहे. ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून ‘ब्लू टीक’ हटवली ट्विटरने व्यंकय्या […]
‘नागीण 3’ फेम अभिनेता पर्ल पुरीला बलात्कार प्रकरणात अटक, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
मुंबई : मालाडमधील मालवणी पोलिसांनी नागीण 3 फेम टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरी याच्यासह पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पर्लसह सहा आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या प्रकरणात पीडितेने पोलिसांकडे जबाब नोंदवला असून पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने सांगितले की, आधी तिच्यावर कारमध्ये […]
ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून ‘ब्लू टीक’ हटवली
नवी दिल्ली : ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक (निळ्या रंगाचं चिन्ह) हटवली आहे. यामुळे लोकांनी या कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अधिकृत हॅन्डल (@VPSecretariat) वर मात्र ही ब्लू टीक कायम आहे. ट्विटरच्या पॉलिसीनुसार, ब्लू व्हेरीफाईड बॅच इतर ट्विटरकर्त्यांना हे सांगण्यासाठी मदत करतो की, संबंधीत ट्विटर […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीकरण मोहीमेचा आढावा, लसीच्या अपव्ययाबाबत चिंता
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना लसीकरण मोहीमेचा शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी लसीच्या अपव्ययाबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी लस उत्पादनासाठी कंपन्यांना करण्यात येणाऱ्या मदतीच्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. लस उत्पादन कंपन्यांना युनिट्स वाढवण्यासह आर्थिक पाठबळ आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सरकार मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांमधील लसीच्या […]










