नवी दिल्ली : ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक (निळ्या रंगाचं चिन्ह) हटवली आहे. यामुळे लोकांनी या कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अधिकृत हॅन्डल (@VPSecretariat) वर मात्र ही ब्लू टीक कायम आहे.
ट्विटरच्या पॉलिसीनुसार, ब्लू व्हेरीफाईड बॅच इतर ट्विटरकर्त्यांना हे सांगण्यासाठी मदत करतो की, संबंधीत ट्विटर हॅन्डल खात्रीशीर, उल्लेखनीय आणि सक्रिय आहे. ट्विटरकडून अशा ब्लू टीक सरकारी कंपन्या, ब्रॅन्ड, गैर सरकारी संघटना, वृत्त संस्था, पत्रकार, राजकीय – मनोरंजन – खेळ – गेमिंग क्षेत्राशी निगडीत व्यक्ती तसंच इतर प्रभावशाली व्यक्तींच्या ट्विटर हॅन्डलला देण्यात येतात.
ट्विटरच्या अटींनुसार, वापरकर्त्याने त्याच्या हँडलचे नाव बदलल्यास किंवा एखादे खाते निष्क्रिय किंवा अपूर्ण असल्यास किंवा वापरकर्त्याने ज्या नावाने सुरुवातीला आपले खाते तयार केले, त्या काळात सत्यापित केले, परंतु बर्याच दिवसानंतरही ते खाते निष्क्रिय असेल, तर ट्विटर कोणत्याही वेळी आणि कोणत्याही सूचनेशिवाय किंवा नोटिशीशिवाय ट्विटर हॅन्डलवरून ब्लू टीक आणि व्हेरिफाईड स्टेटस काढू शकते.
भाजप प्रवक्ते सूरज नाखुआ म्हणाले कि, “ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक का काढली? हा भारतीय राज्यघटनेवर एक प्रकारचा हल्ला आहे.
Why did @Twitter @TwitterIndia remove Blue tick from the handle of Vice President of India Shri @MVenkaiahNaidu ji ?
This is assault of Constitution of India. pic.twitter.com/CBQviuBa3x
— Suresh Nakhua (?? ???? ????) (@SureshNakhua) June 4, 2021




