harassment
क्राईम महाराष्ट्र

धक्कादायक! महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून बलात्कार

वाशिम : वाशिममध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तिच्याच घरात घुसून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा वाशिम शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकाविरुद्धच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गुन्हा दाखल केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव विश्वकांत गुट्टे आहे. पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार, विश्वकांत गुट्टे ओळखीचा फायदा घेऊन ३० मे २०२१ रोजी पीडितेच्या घरी गेले. त्यानंतर त्यांनी पीडित महिलेला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी विश्वकांत गुट्टे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्यांच्यावर ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘नागीण 3’ फेम अभिनेता पर्ल पुरीला बलात्कार प्रकरणात अटक, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत