Maharashtra Local Body Elections 2025: Public Holiday Cancelled in 16 Districts
महाराष्ट्र मुंबई

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

वाशिम जिल्ह्यातील सुविदे फाउंडेशनच्या जमीन भाडेपट्टयाच्या नूतनीकरणास मान्यता

मुंबई : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मौजे करडा येथील सुविदे फाउंडेशनला देण्यात आलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सुविदे फाउंडेशन कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था असून ती ना नफा ना तोटा या तत्वावर चालविण्यात येते. या संस्थेला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ आणि […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये

मुंबई : महिला अत्याचाराची प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या तीन न्यायालयांसाठी प्रत्येकी ५ नियमित पदे (१ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, १ लघुलेखक, १ अधीक्षक, १ वरिष्ठ लिपिक, १ कनिष्ठ लिपिक) […]

27 thousand 797 cusecs discharge from Veer Dam in Satara district; Alert issued
महाराष्ट्र रत्नागिरी

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]

ravikant tupkar firm on movement going to mumbai
अहिल्यानगर महाराष्ट्र मुंबई राजकारण

अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, मुंबईच्या दिशेने निघाले

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास […]

harassment
क्राईम महाराष्ट्र

धक्कादायक! महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून बलात्कार

वाशिम : वाशिममध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तिच्याच घरात घुसून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा वाशिम शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकाविरुद्धच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे. गुन्हा दाखल केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव विश्वकांत गुट्टे […]

229 students and staff at a hostel in Washim infected with corona
कोरोना महाराष्ट्र

भयंकर : वाशिम येथील वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

वाशिम : रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हॉस्टेलमध्ये एकूण 327 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन दिवसांमध्ये चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि २२९ विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. त्यानंतर हा परिसर कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. […]