229 students and staff at a hostel in Washim infected with corona
कोरोना महाराष्ट्र

भयंकर : वाशिम येथील वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

वाशिम : रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हॉस्टेलमध्ये एकूण 327 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन दिवसांमध्ये चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि २२९ विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. त्यानंतर हा परिसर कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हे वसतिगृह यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचं आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी काल तातडीने या निवासी शाळेला भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोना बाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार व इतर आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना केल्या. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके निवासी शाळेमध्ये तैनात ठेवावीत. शाळा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे एक पथक ठेवावे. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. शाळेमध्ये निवासी स्वरुपात राहणाऱ्या व बाधा न झालेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत