Maharashtra Local Body Elections 2025: Public Holiday Cancelled in 16 Districts
महाराष्ट्र मुंबई

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर […]

27 thousand 797 cusecs discharge from Veer Dam in Satara district; Alert issued
महाराष्ट्र रत्नागिरी

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]

Buldhana District: Horrific Three-Vehicle Accident, 5 Dead, 24 Injured
महाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, ५ जणांचा मृत्यू तर २४ जखमी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर आज (दि. २ एप्रिल) पहाटे तिहेरी अपघात घडला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे स्थानिक आणि आपत्कालीन सेवांनी त्वरित मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सकाळी पाच वाजेच्या सुमारास खामगाव ते शेगाव रोडवर जयपुर लांडे फाट्याजवळ हा भीषण […]

Government of Maharashtra
क्रीडा महाराष्ट्र

लातूर, बुलढाणा, सांगली येथे होणार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

मुंबई : राज्यात शासनातर्फे सन २०२३-२४ या वर्षात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा लातूर येथे, छत्रपती शिवाजी महाराज करंडक व्हॉलिबॉल स्पर्धा बुलढाणा येथे, खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लातूर येथे आणि भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली येथे होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. मंत्रालयात विविध […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४च्या अर्थसंकल्पात या महाविद्यालयाची घोषणा केली होती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला याअंतर्गत ६० विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येईल. यासाठी […]

ravikant tupkar firm on movement going to mumbai
अहिल्यानगर महाराष्ट्र मुंबई राजकारण

अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, मुंबईच्या दिशेने निघाले

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास […]

229 students and staff at a hostel in Washim infected with corona
कोरोना महाराष्ट्र

भयंकर : वाशिम येथील वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

वाशिम : रिसोड तालुक्यातील देगावच्या एका आदिवासी वसतिगृहातील 229 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हॉस्टेलमध्ये एकूण 327 विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन दिवसांमध्ये चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि २२९ विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. त्यानंतर हा परिसर कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. […]

jawan pradip mandale of buldana martyred in kargil
देश

शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील जवान प्रदीप मांदळे हे कर्तव्यावर असताना काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये गेल्या हिमस्खलनात शहीद झाले. कारगील व द्रास भागातील हवामान खराब असल्याने त्यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यास उशीर झाला. आज त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का या […]