ajit pawar press conference pune
पुणे महाराष्ट्र राजकारण

मी वाटच पाहतोय की महाविकास आघाडी सरकार कधी पडतेय, झोपेतून उठलो की…

पुणे : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रहार केला आहे. ते म्हटले कि, कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी […]

Maharashtra Will Be Unlocked In Five Levels Order Issued
कोरोना महाराष्ट्र

दिलासादायक : अनलॉकबाबतचा आदेश अखेर निघाला, पूर्ण लॉकडाऊनमुक्तीसाठी ‘हे’ निकष.. जाणून घ्या .. कोणत्या जिल्ह्यात काय सुरु काय बंद?

मुंबई: राज्यातील स्तरनिहाय अनलॉक बाबतचा आदेश अखेर जारी करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे […]

A Ship sunk In The Sea Near The 'Heera Oil Fields; More Than 130 Still Missing
महाराष्ट्र मुंबई

पी-३०५ बार्जचे कॅप्टन राकेश बल्लव यांचा मृत्यू झाल्याचे उघड, रुग्णालयातील बेवारस मृतदेह त्यांचाच..

मुंबई : मुंबई हाय येथे बुडालेल्या बार्ज P ३०५ चे कॅप्टन राकेश बल्लव या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे अखेर डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. जेजे रुग्णालयात ओळख न पटलेल्या बेवारस मृतदेहाचा डीएनए बल्लव यांच्या मुलाशी जुळल्याची माहिती पोलिसांनी दिली. बल्लव कुटुंब काही दिवसांपूर्वी जेजे रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आले होते. तेव्हा एक मृतदेह बल्लव यांचा असावा, […]

Price of Sputnik V vaccine imported from Russia to India announced
कोरोना ग्लोबल देश

DCGI कडून सीरम इंस्टीट्यूटला मिळाली स्पुटनिक-व्ही लस बनवण्याची परवानगी

पुणे : पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII)ला रशियाची स्पुटनिक-व्ही लस बनवण्याची परवानगी मिळाली आहे. लस परीक्षण आणि विश्लेषणासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून काही अटी-शर्तींसह शुक्रवारी सीरमला स्पुटविक-V लस बनवण्याची परवानगी मिळाली आहे. याआधी सीरम इंस्टिट्यूटने पुण्यात असलेल्या हडपसर केंद्रामध्ये लसीचं परीक्षण, पाहणी आणि विश्लेषणासाठ स्पुटनिक-V निर्मितीसाठी परवानगी मागितली होती. तसा अर्ज […]

Mamata Banerjee's younger brother Ashim Banerjee died due to CoronaMamata Banerjee's younger brother Ashim Banerjee died due to Corona
देश राजकारण

बंगालमध्ये लस प्रमाणपत्रावर लावणार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल सरकार आता राज्यात कोरोना लस प्रमाणपत्र देताना पंतप्रधान मोदींच्या ऐवजी ममता बॅनर्जी यांचा फोटो लावणार आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारने कोरोना लस घेणाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रात पंतप्रधानांऐवजी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो वापरल्याने गदारोळ झाला होता. राज्य सरकारने खरेदी केलली लस टोचल्यानंतर प्रत्येक प्रमाणपत्रावर यापुढे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो […]

A Large Slab Of Sahyadri Guest House Collapsed Aaditya Thackeray Escaped
महाराष्ट्र मुंबई

आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले, सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला

मुंबई : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले असल्याची माहिती मिळाली आहे. सह्याद्री अतिथीगृहातील हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज संध्याकाळी पावणे पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली होती. दरम्यान […]

sex life can increase your life span
लाइफ स्टाइल

उत्तम सेक्स लाईफसाठी काय करावे? तज्ज्ञांचं काय मत आहे? जाणून घ्या…

कोरोना संसर्गाचा ताण लोकांच्या शरीरावरच नाही तर मनावरही होत आहे. इतकेच नाही तर अनेक जणांच्या सेक्स लाइफवरही परिणाम झाला आहे. तज्ञांच्या मते, आजूबाजूच्या कोरोना परिस्थितीमुळे लोकांमध्ये तणाव वाढत आहे आणि लैंगिक इच्छा कमी होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या आणि समाधानी लैंगिक जीवनासाठी दाम्पत्याने आठवड्यातून किमान एकदा तरी सेक्स करायलाच हवा. अमेरिकन असोसिएशन ऑफ मॅरेज अँड […]

rapper mc kode aka aditya tiwari allegedly goes missing after shared a cryptic post
मनोरंजन

रॅपर एमसी कोड उर्फ ​​आदित्य तिवारी बेपत्ता, त्याची शेवटची पोस्ट सुसाइड नोट असल्याचा फॉलोअर्सचा दावा

नवी दिल्ली : रॅपर एमसी कोड उर्फ ​​आदित्य तिवारी बुधवारी नवी दिल्लीहून बेपत्ता झाला आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आत्महत्येचे संकेत दिले होते. गेल्या काही दिवसांपासून त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तो वादात सापडला होता, ज्यात त्याने हिंदू महाकाव्य महाभारतावर आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्याच्या या टिप्पणीवर सोशल मीडियातून तीव्र विरोध झाला. […]

actress yami gautam ties the knot with best friend aditya dhar
मनोरंजन

अभिनेत्री यामी गौतमने केलं लग्न, चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का

मुंबई : अभिनेत्री यामी गौतमने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर करत तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. तिने तिचा जिवलग मित्र आदित्य बरोबर लग्न केले आहे. यामीने कधीही त्यांच्या दोघांच्या नात्याविषयी उघडपणे काहीही सांगितले नव्हते, त्यामुळे ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. यामीने कॅप्शनसह एक फोटो पोस्ट करत लिहिले कि, “आमच्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आम्ही आज लग्नाच्या […]